3 वर्षानंतर Passion Plus ची पुन्हा एंट्री! Hero ने नव्या अवतार केली लाँच, किंमत खूपच कमी

नवी दिल्ली : Hero MotoCorp ने भारतात नवीन 100cc अवतारात Passion Plus सादर केला आहे. पॅशन प्लसने तीन वर्षांहून अधिक काळानंतर भारतीय बाजारपेठेत पुनरागमन केले आहे कारण ते BS6 उत्सर्जन मानदंडांमुळे 2020 च्या सुरुवातीला बंद करण्यात आले होते. नवीन हिरो पॅशन प्लस 75,131 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीसह लॉन्च करण्यात आला आहे.

बाईकमध्ये नवीन काय आहे?
या बाईकचे डिझाईन पूर्वीसारखेच आहे परंतु तुम्हाला बॉडीवर नवीन ग्राफिक्स पाहायला मिळतील. ही बाईक तुम्हाला तीन रंगांमध्ये मिळेल, ब्लॅक नेक्सस ब्लू, स्पोर्ट्स रेड आणि ब्लॅक हेवी ग्रे.

हार्डवेअरच्या बाबतीत, Passion Plusला मागील बाजूस टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक ऍब्जॉर्बर्स मिळतात. बाइक नियंत्रित करण्यासाठी IBS सह ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

इंजिन आणि मायलेज
नवीनतम Hero Passion Plus मध्ये सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित 97.2cc इंजिन आहे जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. ट्रान्समिशनसाठी, हे इंजिन 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. पॅशन प्लसच्या लेटेस्ट एडिशनच्या मायलेजबाबत कंपनीने खुलासा केलेला नाही. एक लिटर इंधनाच्या वापरावर ही बाईक सुमारे 60 किलोमीटरपर्यंत धावेल अशी अपेक्षा आहे.

पॅशन प्लस थेट Honda Shine 100, TVS Radeon आणि Bajaj Platina सारख्या मोटरसायकलशी स्पर्धा करेल. Honda ने नुकतेच Shine 100 लॉन्‍च केले आहे.