अरे बापरे : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेला चोरीला

  तरुण भारत लाईव्ह ।०८ फेब्रुवारी २०२३। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज      यांचा अमेरिकेतला एकमेव पुतळा चोरट्यांनी चोरला आहे. चोरट्यांनी अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग चोरून नेला आहे. नेबरहूड सव्‍‌र्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल      ट्विट करत माहिती दिली.

उत्तर अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा कॅलिफोर्नियातील सॅन जोस शहरातील एका उद्यानातून चोरीला गेला आहे. सॅन होजे येथील पार्क, रिक्रिएशन आणि नेबरहूड सव्‍‌र्हिसेस विभागाने शुक्रवारी याबद्दल माहिती दिली.  छत्रपतींच्या पुतळ्याची चोरी कधी झाली? हे अजून समजले नाहीये. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या मदतीने सदर पुतळ्याची विटंबना करून तो चोरणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून सॅन जोस शहराला देण्यात आला होता.  सॅन जोस शहर हे पुणे शहरासारखे आहे. दोन्ही शहरांमधील अनेक गोष्टीत साधर्म्य आहे. दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आणि इतिहास आहे. दोन्ही शहरे शिक्षणाचे केंद्र आहेत. यामुळे सॅन जोस या शहराची ओळख पुणे सिस्टर सिटी म्हणून झाली.अमेरिकेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे शिवप्रेमी दु:खी झाले आहे. त्याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपासासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन देखील केले.