Himachal : काँग्रेसचे संकटमोचक हिमाचलकडं रवाना : मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केवळ अफवाच

HHimachal :  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार कोसळण्याची स्थिती असून काँग्रेसचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सिख्खू यांनी राजीनामा दिल्याच्या चर्चा आहेत.  या घडामोडींनंतर भाजपला  सरकार स्थापन करणं इतकं सोपं असणार नाही. कारण काँग्रेस हायकमांडंनं काँग्रेसच्या संकटमोचकाला हिमाचलची परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत.

 

काँग्रेसचे संकटमोचक अर्थात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते डीके शिवकुमार  यांनी ट्विट करत आपण काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार हिमाचल प्रदेशकडे जायला निघालो आहोत असं म्हटलं आहे

कोणत्याही अफवांमध्ये गुरफटण्याची गरज नाही, कारण मला विश्वास आहे की, काँग्रेस पक्षाचे आमदार पक्षाशी एकनिष्ठ राहतील आणि त्यांना मिळालेल्या जनादेशाचं ते पालन करतील. मात्र, या प्रक्रियेत लोकशाही आणि जनतेचा जनादेश चिरडण्याचा मुद्दाम प्रयत्न करून सत्ता ओरबाडण्यासाठी भाजप कोणत्या थराला जात आहे, हा चिंतेचा विषय बनला आहे, असं डी के शिवकुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे

 

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केवळ अफवाच

 

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर सुखविंदरसिंग सुख्खा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मला कोणीही राजीनामा मागितला नाही किंवा मी कोणालाकडंही राजीनामा सोपवलेला नाही. आम्ही बहुमत सिद्ध करुन दाखवू, आम्ही जिंकू आणि हिमाचलची जनताही जिंकेल”