---Advertisement---
भुसावळ : येथील भुसावळ कला ,विज्ञान आणि पु ओं नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे ‘हिंदी सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले. यावेळी हिंदी सप्ताहाचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ . डी. ए.न पाटील यांनी केले .
हिंदी सप्ताह अंतर्गत नाहाटा महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात कथोपकथन, काव्यवाचन, निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा,पोस्टर प्रदर्शन आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य डॉ . डी . एन . पाटील म्हणाले की, हिंदी भाषा सर्वांना समजणारी भाषा आहे. संपूर्ण भारतात बोलली जाणारी ही भाषा आहे.
ते पुढे म्हणाले की, सामान्यतः व्यक्तीच्या संवेदना, भाव भाषेद्वारे व्यक्त होतात. भाषाही अर्जित संपत्ती आहे. कबीरदास, तुलसीदास, सूरदास, प्रेमचंद, दिनकर यांच्या माध्यमातून अहिंदी भाषेचा व्यक्ति ही हिंदी भाषेविषयी आवड निर्माण होते. हिंदी सप्तहात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रा .डॉ .मनोज पाटील यांनी केले. हिंदी सप्ताहाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. डॉ. राजेंद्र तायडे यांनी मानले. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थींनी उपस्थित होते