हिंदुत्व : एक पवित्रा !

इतस्तत:

– डॉ. विवेक राजे

Hindutva सातत्याने मागील अनेक वर्षांपासून विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे, हिंदुत्व हे नक्की काय असतं? कुणाच्या मते सतत चर्चिला जाणारा, पण हाती काहीही ठोस न लागणारा विषय म्हणजे हिंदुत्व. काहींच्या मते समाज जीवनातील एक समृद्ध आणि टाकून देता येत नाही, अशी अडगळ म्हणजे हिंदुत्व. Hindutva काहींच्या मते, काही लोकांना सत्ता स्थानी पोहोचविण्यासाठी वापरलेले साधन म्हणजे हिंदुत्व. काहींच्या मते भारतीय समाजात धार्मिक फूट पाडणारा विचार म्हणजे हिंदुत्व. काहींच्या मते हिंदू समाजाचा बुद्धिभेद करण्यासाठी वाटेल तसा वापरता येणारा विचार म्हणजे हिंदुत्व. Hindutva पण, वास्तवात या सगळ्याच्या पलीकडे जाऊन चार अंगुळे उरतं, ते नवनीत म्हणजे हिंदुत्व ! हे सगळं समजून घ्यायचं असेल तर सर्वप्रथम या आमच्या देशात, या मातीत सांगितली गेलेली धर्माची संकल्पना समजून घेतली पाहिजे. Hindutva त्यानंतर मग हिंदू धर्माची संकल्पना समजून घेणे आवश्यक ठरते. या दोन संकल्पना समजून घेतल्या की, हिंदुत्व ही संकल्पनादेखील सुस्पष्ट होते.

Hindutva धर्म या संकल्पनेच्या अनेक व्याख्या सहजपणे उपलब्ध आहेत. योग्य आणि आमची, म्हणजे भारतीय वैचारिकतेने केलेली धर्माची व्याख्या आम्हाला सांगितली जात नाही तर त्या ऐवजी पाश्चात्त्य विद्वानांनी तयार केलेली व्याख्या आम्हाला सांगितली जाते. भारतीय संस्कृतीत धर्म म्हणजे समाज आणि निसर्गाच्या हितकारी अशी माणसाची सर्वसामान्य वागणूक होय. तर, पाश्चात्त्य संस्कृतीत उपासना पद्धती निगडित अशी, माणसाची सर्वसामान्य वागणूक म्हणजे धर्म. महाभारतात धर्माची पुढील व्याख्या दिलेली आढळते. ‘धारणा धर्म एत्याहू, धर्मो धारयते प्रजा।’ Hindutva म्हणजे या संपूर्ण सृष्टीला जो धारण करतो, या सृष्टीचे रक्षण करतो, संवर्धन करतो, त्याला धर्म असे म्हणतात. याचा अर्थ असा की, या सृष्टीचे संवर्धन करण्यासाठी, जे जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते ते प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण समाजाची योग्य अशी मानसिकता तयार करणे. या सामाजिक मानसिकतेतून सृष्टी संवर्धनासाठी आवश्यक ते कार्य, ती सामूहिक तसेच वैयक्तिक कृती घडणे म्हणजे धर्म होय. निसर्गाचे संवर्धन करताना लोकांमधील मानवीय व्यवहार इथे अपेक्षित आहे. Hindutva निसर्गाने जे आपल्याला मुक्त हस्ताने दिले आहे, त्याचा अनिर्बंध उपभोग ही पाश्चात्त्य संकल्पना होय. तर, नैसर्गिक संसाधनांचा सुयोग्य पद्धतीने वापर आणि संवर्धन ही भारतीय संकल्पना होय. मानवी जीवन जर निसर्गाच्या सान्निध्यात, निसर्गाच्या आधारेच समृद्ध होत असेल तर त्या निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे म्हणजे धर्म होय. Hindutva एखाद्या आराध्य दैवताचं पूजन करणं हे या व्यापक संकल्पनेतील एक छोटासा भाग ठरतो. Hindutva निसर्गाचे संरक्षण आणि संवर्धन हा अधिक व्यापक, मोठा व महत्त्वाचा भाग ठरतो.

पण निसर्गाने उदारपणे मानवाला दिलेल्या संसाधनांचा वापर न करता फक्त त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे जीवन समृद्धीकडे पाठ फिरवणे ठरते. Hindutva मानवी जीवन सुखी व समृद्ध असणे, हेही नितांत आवश्यक आहे. मानवाची उत्क्रांती होणं हे देखील महत्त्वपूर्ण आहे आणि उन्नती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. निसर्गातील संसाधनांचा वापर आणि त्याद्वारे ऐहिक दृष्टीने सुखकर जीवन तसेच माणसाची उन्नती या दृष्टिकोनातून कणाद मुनींनी धर्माची व्याख्या केली आहे. Hindutva कणाद मुनी म्हणतात, ‘यतो अभ्युदयो निश्रेयस सिद्धीही स धर्मा:।’ ही व्याख्या मानवी जीवनाच्या दोन्ही अंगांचा विचार करते. अभ्युदय म्हणजे ऐहिक बाजू. मानवी जीवन सुखी करण्यासाठी आवश्यक अशी सर्व प्रकारची समृद्धी असणं म्हणजे अभ्युदय तर निश्रेयस म्हणजे आध्यात्मिक उन्नती होय. कणाद मुनींच्या मते, ज्यामुळे माणसाचं वैयक्तिक जीवन सुखी होईल तसेच त्याची आध्यात्मिक व सामाजिक उन्नती होईल ती कृती किंवा धारणा म्हणजे धर्म होय. Hindutva ‘विकिपीडिया’ या वेबसाईटवरदेखील धर्माच्या अनेक व्याख्या उपलब्ध आहेत. त्यापैकी एक व्याख्या अशी- ‘धर्म ही अशी सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्था आहे, ज्यात ठरावीक वागणूक, प्रथा, नीतिमत्ता, विश्वास, दृष्टिकोन, लेखन, धार्मिक स्थळे, संघटना, भविष्यवाणी, मूलतत्त्वे या सर्वांचा समावेश होतो; ज्याद्वारे माणसाला आध्यात्मिक व ऐहिक उन्नती करून घेता येते.

Hindutva या तीनही व्याख्यांमध्ये आढळणारे समान तत्त्व म्हणजे, ज्या योगे मनुष्य जातीची उन्नती साधली जाईल अशी एकत्रित वागणूक म्हणजे धर्म होय. या तीनही व्याख्या कोणत्याही विशिष्ट उपासना पद्धतीचा आग्रह धरणा-या नाहीत. यावर आधारित हिंदू धर्माची व्याख्या करायची झाली तर, या देशातील सामाजिक, सांस्कृतिक, प्रथा, नीतिमत्ता, विश्वास, धार्मिक स्थळे, संघटना, जीवनमूल्ये यांचे संरक्षण व संवर्धन करणारी जीवनपद्धती, म्हणजे हिंदू धर्म होय, ही जीवन पद्धती सर्व समावेशक, उदार अशा सामाजिक वागणुकीकडे निर्देश करते, असे म्हणता येईल. Hindutva याच पद्धतीने हिंदू कोण याची व्याख्या करताना, स्वातंत्र्यवीर सावरकरदेखील कोणत्याही उपासना पद्धतीचा त्यात अंतर्भाव करीत नाहीत. ‘आ सिंधु सिंधु पर्यंन्ता यस्य भारतभूमिका; पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृत:!!’ Hindutva ते स्पष्टपणे म्हणतात की, सिंधू नदीपासून हिंद महासागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो आपल्या पूर्वजांची भूमी मानतो, तो प्रत्येक माणूस हिंदू आहे. अर्थात जो या मातीत जन्म घेतलेल्या संकल्पनांच्या आधारे जीवन व्यतीत करतो तो हिंदू !

Hindutva म्हणजेच जो या देशातील संकल्पना, निसर्ग, संस्कृती, चालीरीती, प्रथा, परंपरा, श्रद्धा, विश्वास, जीवनतत्त्व यांचे संरक्षण व संवर्धन करतो तो हिंदू. अशा हिंदू माणसांचा मिळून जो समाज तयार झालेला आहे, त्या समाजाची सर्वसाधारण वागणूक म्हणजे हिंदू धर्म. या पृष्ठभूमीवर हिंदुत्वाचा विचार केला तर असं लक्षात येते की, या देशातील निसर्ग, समाज, जनजीवन, संस्कृती, विश्वास, प्रथा, परंपरा, जीवनमूल्ये यांचे संरक्षण व संवर्धन करणारी विचारधारा वा जीवन पद्धती म्हणजे हिंदुत्व होय. सर्वोच्च न्यायालयाने १९९६ मध्ये हिंदुत्वाची व्याख्या ‘एक जीवन पद्धती’ अशीच केलेली आहे. Hindutva आमच्या देशावर झालेल्या असंख्य राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणामुळे येथील मूळ विचारधारा दूषित झालेली आहे. येथील संस्कृती, विश्वास, जीवनमूल्ये यांना बदलून टाकून त्या ठिकाणी पाश्चात्त्य विचारांचे रोपण करीत सामाजिक आणि धार्मिक व्यवस्था पाश्चात्त्य वा मध्य पूर्व पद्धतीची करण्याचे हजारो वर्षे प्रयत्न होत आहेत. हे आक्रमण कधी उघडपणे तर कधी छुपेपणे होत आले. Hindutva यात आमच्या समाजाच्या सांस्कृतिक वारश्याची अपरिमित हानी झाली. ही होणारी हानी रोखण्यासाठी हिंदू समाजाने काही ठोस पवित्रा घेणे आवश्यक होते आणि आहे, तो सामूहिक व वैचारिक पवित्रा म्हणजे हिंदुत्व होय.

या देशावर मध्य पूर्व आणि त्या पलीकडील युरोपातून अनेक आक्रमणे झाली. Hindutva या देशावर झालेले प्रत्येक आक्रमण हे जसे येथील संपत्ती, उपजाऊ जमीन बळकावण्यासाठी झाले तसेच येथील संस्कृती, विचार पद्धती, आध्यात्मिकता यावरही केले गेले. हे आक्रमण प्रामुख्याने येथील उदारमतवादी संस्कृतीवर झाले. येथील उदार समाज व्यवस्था, उपासनेचे स्वातंत्र्य व जीवन पद्धती यावरही झाले. या आक्रमणांचे प्रमुख उद्दिष्ट हे या प्रदेशातील सामाजिक व धार्मिक व्यवस्था खारीज करून त्या ठिकाणी आपल्या धार्मिक श्रद्धा, विश्वास, प्रथा, परंपरा, जीवनमूल्ये यांची स्थापना करणे, हे होते आणि आहे. Hindutva या देशातील राजकीय व्यवस्था ताब्यात घेऊन कोणी कितीही वर्षे अधिकार चालवला तरी येथील सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेवर आघात करणे शक्य नव्हते आणि नाही. त्यामुळे जर सगळं जग आमच्या श्रद्धा व पद्धतीने चालवायचे असेल तर तेथील संस्कृती विचारांवर आघात करणे आवश्यक आहे, हे मध्य पूर्व आणि पाश्चात्त्य जाणून आहेत. Hindutva आज जवळजवळ दोन हजार वर्षे सतत संघर्ष करूनही या देशातील व्यवस्था उद्ध्वस्त झालेली नाही, करता आलेली नाही. आम्ही श्रेष्ठ, आमचे विचार श्रेष्ठ. सगळ्या जगावर आम्हीच राज्य करणार.

सगळं जग आमच्या विचारांनी, आम्ही सांगू तसे चालेल, ही दर्पोक्ती इथे चालली नाही, चालत नाही. Hindutva इथे सातत्याने इच्छित उद्दिष्ट गाठण्यात आम्ही अपयशी ठरतो आहोत. हे लक्षात घेऊन येथील सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची दीर्घकालिक खेळी इथे खेळली जात होती आणि आहे. ही खेळी निष्प्रभ करण्यासाठी आवश्यक आहे, ते येथील धार्मिक व्यवस्था, संस्कृती, विश्वास, प्रथा, परंपरा, जीवनमूल्ये यांचे संरक्षण व संवर्धन. Hindutva हा लढा मागील दोन हजार वर्षे सातत्याने चालूच आहे. काळानुरूप आम्ही आमच्या अनेक गोष्टींमध्ये बदल केले. अनेक प्रथा-परंपरा सोडून देत त्या ठिकाणी कालसुसंगत असे बदल केले. हे या जीवन पद्धतीचे, हिंदू धर्माचे संवर्धन होय. Hindutva हे तर आम्ही आतून करत होतो, करीत आहोत. व्यक्ती आणि समूह सख्खलनशील असल्याने हा अंतर्गत लढा चालूच होता व राहील. त्याच वेळी या देशाबाहेरील विचार, विश्वास, धार्मिक श्रद्धा इथे रुजवण्याचा जो एक आक्रमक प्रयत्न चालू आहे.

आमचे छुपे वसाहतीकरण करण्यात येत आहे, तो बाह्य लढा आहे. या वसाहतीकरणाला, मानसिक गुलामीला विरोध करणं आवश्यक आहे. त्यासाठी या प्रदेशातील हे विचार, विश्वास, जीवनमूल्ये, धार्मिक श्रद्धा, धार्मिक उदारता, व्यवस्था, सर्वसमावेशकता, विविध उपासना पद्धती इत्यादींची जोपासना करणे आवश्यक ठरते. Hindutva आमचा वारसा, आमची विचार पद्धती, आमची जीवनमूल्ये, जीवन पद्धती, यांची जोपासना व संवर्धन करणारा सर्वंकष विचार, निश्चय आणि त्या दिशेने कृतिशीलता म्हणजे हिंदुत्व होय. Hindutva ‘सर्वंकष हिंदू समाज’ व ‘हिंदू राष्ट्र विचारांची’ जोपासना करण्यासाठी घेतलेला पवित्रा म्हणजे हिंदुत्व होय.

९८८१२४२२