हिंदूंनो, जरा सावध व्हा…!

चंद्रशेखर जोशी
तरुण भारत लाईव्ह । 
आमच्या अनेक मंदिरांवर हल्ले झाले… त्या ठिकाणी मशिदी उभ्या राहिल्या… सहन केले कारण हिंदू संयमी आहेत. अगदी जिल्ह्याचा विचार करता एरंडोलच्या पांडव वाड्याचे उदाहरण बघा. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यावर योग्यवेळी न्याय मिळेलच. स्थानिक  कार्यकर्ते यासाठी लढा देत आहेत. धरणगावच्या गायरान जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमणे होती त्यासाठी लढा द्यावा लागला.अखेर न्यायालयाने आदेश केला आणि ते अतिक्रमण जमीनदोस्त झाले. आमच्या प्रभू  रामजन्मभूमीसाठी अनेक आंदोलने झाली. अखेर याप्रश्नीही न्यायालयाने  निर्देश दिले. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली पण आमची अनेक स्फूर्तीस्थाने, भक्ती स्थानांमध्ये जाण्याचे स्वातंत्र्य आहे काय? तर नकारात्मक उत्तर मिळेल. कारण हिंदू सहिष्णू आहे.सहन करतो बिचारा… रावेर, यावल एवढेच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या पाळधी सारख्या गावांमध्ये मिरवणुका निघतात. त्यावेळी त्या वाजत गाजत मशिदीवरून का नेल्या म्हणून तुफान दगडफेक होते. भक्तगणांचे जीव जातात… तरी गरीब बिचारा हिंदू सहन करतो… शांत बसतो… कारण असते एकात्मता… संयम. सहिष्णुता आणि एकात्मका या सर्व  बाबी आवश्यक आहेतच, पण त्याचा विचार हा नेहमी एका बाजूनेच होणे गरजेचे आहे काय?.  गेल्या काही वर्षांपासून एक प्रकार सुरू आहे तो म्हणजे… गोरगरीब हिंदू, आदिवासी कुटुंबांचे धर्मांतर घडवून आणणे. यावर्षीच्या प्रारंभी जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोरबंजारा आणि लबाना-नायकडा समाज महाकुंभ झाला. महाकुंभाचा हा कार्यक्रम हिंदू धर्माच्या रक्षणासाठी व देशासाठी महत्वाचा ठरला. हा कुंभ म्हणजे बंजारा समाजाच्या अस्मितेचा हुंकार म्हणून देशभरात एक महत्वपूर्ण संदेश देणारा ठरला. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अनेक आदिवासींची घरवापसी झाली.

हिंदू धर्माने अनेक धक्के सहन केले आहे व केले जात आहे. त्यात आता आणखी एक फोफावत चाललेला प्रकार म्हणजे ‘लव्ह जिहाद’ याचे स्तोम हळूहळू व्यापक होत चालले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर परवाचा प्रकार. जळगाव शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी आलेल्या एका  महाविद्यालयीन तरुणीच्या बाबतीत ही घटना घडली. दोघा मुस्लीम तरुणांनी आपले मुस्लीम नाव बदलून आपण हिंदू असल्याची बतावणी करीत या मुलीशी परिचय वाढवला. नंतर ओळख वाढवत- वाढवत तिला अभ्यासानिमित्त रूमवर बोलावून तिच्या बरोबर फोटो घेतले. नंतर तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. आरोपीचा पिता बांधकाम कामगार आहे, पण त्याचा मुलगा जळगावात पाच हजारांचे भाडे भरून राहतो. मोठ्या प्रमाणात पैसा उडवतो. मग प्रश्न निर्माण होतो की, अशी कृत्ये करायला बाप एवढा पैसा देऊ शकतो का? तर त्याचे उत्तर नकारात्मक येते. मग हा पैसा कोणी देत तर नसेल ना? कारण अशा कृत्यांना फंडिंग होत असते, असेही वृत्त आहे.  या मुलांकडे लॅपटॉप, महागडे मोबाईल, पेनड्राईव्ह जप्त करण्यात आले.   पोलीस तप्तरी ओझरत्या उल्लेखानुसार लॅपटॉपमध्ये काही फोटो आढळून आले. त्यामुळे यामागे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तविली जात आहे आणि त्यात काही प्रमाणात सत्यही आढळून आले आहे.  पोलीस तपासात योग्य ते बाहेर येईलच. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मागे गणेश कॉलनी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये दोन तरुणी व दिल्लीहून आलेल्या एका मुस्लीम युवकास पकडले होते. फेसबूकवरून मैत्री करत त्याने या मुलीला फसविले होते. त्यांना काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, मात्र पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले,  त्यातीलच एका युवतीने बदनामीच्या भीतीने नंतर आत्महत्या केली. असे प्रकार वारंवार होत आहेत. त्याला फारसा विरोध होताना दिसत नाही, याचेही  कारण तेच  ते म्हणजे  हिंदू सहिष्णू आहेत…!

‘काश्मीर फाईल्स’, ‘द केरला स्टोरी’सारखे डोळ्यात जळजळीत अंजन घालणारे चित्रपट प्रदर्शित होतात. काही काळ चित्रपट पाहून आम्ही संताप व्यक्त करतो. पण डोळेे उघडतात का? आमच्या मुली शिक्षणासाठी येतात. बाहेरून ग्रामीण भागातून त्या आल्या आहेत, हे नेमके हेरून त्यांना फसविले जाते. आता हे पुन्हा समोर आले आहे. या प्रकाराचे भविष्यात काय होणार हे सर्वच जाणतात. आमची संस्कृती निश्चितच महान आहे. छत्रपती शिवरायांचा आदर्श आम्ही पाळतो. परधर्मियांचा आदर करण्याची आमची संस्कृती आहे, पण त्याला मर्यादा आहेत… शहरात घडणार्‍या या प्रकारांना मुठभरांकडून विरोध होतो… असे नको म्हणून सांगावेसे वाटते ‘हिंदूंनो, सावध व्हा…सतर्क रहा…!’