इतस्ततः
– डॉ. विवेक राजे
१८५७ च्या बंडानंतर इंग्रज या देशातील हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मीयांकडे संशयाने पाहू लागले. या बंडानंतरच ईस्ट इंडिया कंपनीचे या देशावरील नियंत्रण संपुष्टात आले.त्या जागी ब्रिटिश शासन आले. याच काळात अनेक हिंदू ब्रिटिश प्रशासनात महत्त्वपूर्ण जागांवर दिसू लागले. कारण, त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली. हे मुसलमान समाजाच्या बाबतीत मात्र घडले नाही; कारण त्यांना इंग्रजी भाषा येत नव्हती याच काळात अनेक स्थित्यंतरे घडत होती. सय्यद अहमद खान एकीकडे ब्रिटिश सरकारला भुरळ घालण्याचा प्रयत्न करीत होता तर दुसरीकडे ब्रिटिशांच्या अगोदर या देशात मुस्लिम राज्यकर्ते राज्य करीत होते, या तद्दन चुकीच्या समजुतीत या देशावर पुन्हा इस्लामिक राजवट आणण्यासाठी मुसलमानांना एकत्र करीत होता.काँग्रेस बहुसंख्य हिंदूंची प्रतिनिधिक संघटना होती. काँग्रेसमध्ये मुसलमानांचा सहभाग फारसा नव्हता. पण मुसलमानांना बरोबर घेण्याची प्रचंड धडपड चालली होती.मुस्लिम समाज, जगात कुठेही इतर धर्मांच्या लोकांसोबत गुण्यागोविंदाने राहू शकत नाही, हा इतिहास सर्वज्ञात असूनही हिंदू नेते हा प्रयत्न करीत होते. वानगीदाखल एक-दोन उदाहरणे सहज देता येतील.
एक म्हणजे अहमद खान बरेलवीसारखे लोक येथील मुसलमानांना आधीपासूनच वहाबी शिकवण देत होते. इस्लामच्या दृष्टीने सगळे जग दोन भागांत विभागले आहे. दार-उल-इस्लाम म्हणजे जेथे इस्लामिक राजवट आहे असा प्रदेश तर दार-उल-हरब म्हणजे असा प्रदेश जेथे मुसलमान राहतात, पण राजवट इस्लामिक नाही. बहुसंख्य मुसलमानांची हीच धारणा होती आणि आहे. दुसरे उदाहरण सय्यद अहमद खान हे अलीगढ चळवळीचे जनक, हिंदू मुसलमानांचे एक लोकशाही राष्ट्र या विषयांवर भाष्य करताना १८८३ मध्ये म्हणतात की, ‘‘संख्येने मोठा असलेला समाज हा संख्येने लहान असलेल्या समाजाच्या हितसंबंधांना बाधित करेल, झाकोळून टाकेल.” सय्यद अहमद खान यांना तेव्हाही बहुमताच्या हिंदूंच्या लोकशाहीला विरोध करायचा होता, असेच दिसते. Hindu and r हिंदू आणि मुस्लिम समाजातील दरी वाढतच चालली होती. काँग्रेस मुस्लिम समाजाचे लांगूलचालन करण्यात मश्गूल होती. या सगळ्या गदारोळात काही हिंदू नेत्यांना मात्र मुस्लिम कट्टर आणि फुटीर मानसिकतेची पूर्ण कल्पना होती. १९२५ साली लाला हरदयाळ लाहोरच्या ‘प्रताप”मध्ये लिहितात की, हिंदू वंश, हिंदुस्थान आणि पंजाब यांचे भवितव्य हे हिंदू संघटन, हिंदू राज्य, मुस्लिम शुद्धीकरण आणि अफगाणिस्तान व सीमा प्रांतांचे स्वामित्व या चार गोष्टींवर अवलंबून आहे. जोपर्यंत हे साध्य होत नाही तोपर्यंत आमच्या पुढील पिढ्या सुरक्षित असणार नाहीत. (संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर; थॉटस् ऑन पाकिस्तान; पृष्ठ क्रमांक १२३.)
आयुष्याची २७ वर्षे निर्बंधात राहूनही या महापुरुषाने समाजसुधारणा, भाषाशुद्धी, काव्यलेखन, नाट्यलेखन, विविध पुस्तके असे महाप्रचंड योगदान दिले. या सगळ्या योगदानात त्यांनी हिंदुत्व या संकल्पनेला दिलेला आकार हा लखलखणारा शिरपेच ठरतो. हिंदुत्व/हिंदू राष्ट्र या विषयावर स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, लाला हरदयाल यांनीही विचार मांडलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना सूत्रबद्ध व वैज्ञानिक स्वरूप दिले आणि हिंदूंच्या राजकीय व सामाजिक आकांक्षा व विचारांची एक सैद्धांतिक मांडणी केली. हे करून सावरकर थांबले नाहीत, तर आपण मांडलेल्या सैद्धांतिक तत्त्वांसाठी, विचारांसाठी जवळजवळ एकाकी लढत राहिले. सावरकरांनी आपल्या प्रज्ञेने हिंदू कोण हे सांगताना धर्म, संस्कृती आणि भौगोलिक स्थान या तीनही गोष्टी एकत्र आणल्या तसेच या प्रदेशाशी एकनिष्ठ असणं आवश्यक आहे, हेही सांगितले. ‘आसिंधु सिंधु पर्यन्ता यस्य भारतभूमिका.” सिंधू नदीपासून ते समुद्रापर्यंत पसरलेला हा खंडप्राय प्रदेश हे निश्चित असे भौगोलिक स्थान त्यांनी निश्चित केले. एखाद्या प्रदेशाची राष्ट्र म्हणून उभारणी होण्यासाठी फक्त अखंड प्रदेशच नव्हे, तर अजून काही घटकांचे अस्तित्व आवश्यक असते. हे घटक कोणते? त्यांचे या समाज जीवनातील महत्त्व आणि स्थान कोणते याचाही विचार आवश्यक असतो. हे घटक त्या त्या समाजजीवनात चिरस्थायी असणे अत्यंत आवश्यक असते. हा विचार सावरकरांच्या व्याख्येत साकल्याने झालेला दिसतो.
या पुढल्या ओळीत ते या प्रदेशाशी असलेल्या नात्याची निश्चित अशी व्याख्या करतात…
‘पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत:’ हे सांगून ते या प्रदेशात राहणा-या लोकांच्या मनातील भावना व विचार स्पष्ट करतात. या विस्तीर्ण प्रदेशात राहणारी जी व्यक्ती या प्रदेशाला आपल्या पूर्वजांची, राहण्याची भूमी मानते. नुसता रहिवास नव्हे तर ही भूमी, हा देश, येथील संस्कृती, चालीरीती, जीवनमूल्य, निसर्ग यांच्याशी तादात्म्य पावत या सगळ्या गोष्टींशी आपलं जन्मापासून एक नातं आहे, असं मानते. ती प्रत्येक व्यक्ती हिंदू होय. हिंदुत्व हे केवळ हिंदू धार्मिकत्व नाही.ते केवळ आध्यात्मिक किंवा धार्मिक इतिहासावर आधारलेले नाही तर त्याला हिंदू समाजाच्या संपूर्ण इतिहासाचे अधिष्ठान आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाला कोणताही धर्म सिद्धांत वा पंथ अभिप्रेत नाही तर या प्रदेशात राहणाèया आणि कोणत्याही स्वरूपात अस्तित्वात असणा-या हिंदू वंशाला आकार देणा-या सर्व विचार शाखा, सर्व पंथ, त्यांच्या उपासना पद्धती, विविध चालीरीती व परंपरा, इतिहास, वाङ्मय या सर्वांचा यात समावेश होतो. म्हणजे हिंदू धर्मातील सर्व पंथ जसे की बौद्ध, जैन, शीख, शाक्त, शैव, वैष्णव, आस्तिक-नास्तिक, सर्व जाती-पाती, वनवासी अशा सर्वांचा ते हिंदुत्वाच्या संकल्पनेत समावेश करतात. समान धर्म, संस्कृती, इतिहास, परंपरा, भावभावना, जीवनमूल्य अशा बंधांनी एक असलेला आणि एका भौगोलिक प्रदेशात राहणा-या मानव समूहास राष्ट्र म्हणतात. हिंदू समाजाचे धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक बंध हे मजबूत आहेत. ते एक राष्ट्र ठरते.
प्रादेशिक एकता हा राष्ट्रीयत्वाचा एकमेव घटक असूच शकत नाही. त्यामुळे भारतातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्यक समाज हे राष्ट्र होऊ शकत नाहीत. मुस्लिम समाज आजही आपले सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक आणि ऐतिहासिक बंध हे अरबस्थानशी जोडतो. आपली मुळं त्या सभ्यतेत शोधतो, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. मुस्लिम समाजाच्या निष्ठा आजही या देशाच्या संस्कृतीशी बांधिलकी सांगणाèया नाहीत. अगदी मुलांची नावेदेखील, तैमूर, जलाल, आफताब ठेवण्यात येतात, यातून हे स्पष्ट दिसून येते. हे येथील संस्कृती नाकारणेच आहे. हा समाज आजही सातत्याने आपलं ‘मूळ’ अरबस्थानात तर ‘कुळ’ अरबी वंशाला नेऊन भिडवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. येथील संस्कृती, इतिहास, परंपरा नाकारताना दिसतो. येथील संस्कृती, आर्थिक व सामाजिक व्यवस्था बदलून त्या जागी मध्य पूर्वेतील व्यवस्था लादण्याची आकांक्षा बाळगून असतो.इस्लाम समजून घेणे म्हणजे फक्त त्यांचे रीतीरिवाज, कुराणातील आयाता समजणे नव्हे, तर इस्लामची ‘जर, जोरू आणि जमीन’ यांची न भागणारी भूक समजणे होय. आपली विचारसरणी, आध्यात्मिकता, श्रद्धा इतरांवर लादण्याची अविरत अशी आकांक्षा समजणे होय. स्वातंत्र्यवीर सावरकरांना इस्लाम आणि ख्रिस्ती धर्मांची ही वसाहतवादी विचारसरणी स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे त्यांची हिंदुत्वाची संकल्पना फक्त प्रादेशिक एकता किंवा अखंडता या घटकांपर्यंत मर्यादित राहात नाही तर त्याहून महत्त्वपूर्ण असे सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक, ऐतिहासिक या घटकांशी बांधिलकी स्पष्ट करणारी आहे. या देशाची एकता व अखंडता तसेच सांस्कृतिक, धार्मिक, वांशिक, ऐतिहासिक वारस्याचे संरक्षण व संवर्धन करणारे राष्ट्रीयत्व म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत असलेले ‘हिंदुत्व’ होय.
९८८१२४२२२४