तरुण भारत लाईव्ह । २३ ऑगस्ट २०२३। भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. आज चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर लँडिंग झालं आहे.
आज भारताने एक नवा इतिहास रचला आहे. भारताच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही इस्त्रोच्या टीमचं अभिनंदन केलं. तसेच शास्त्रज्ञांच सर्वच स्तरातून आणि क्षेत्रातून कौतुक केलं जात आहे.
भारताची ही मोहिम यशस्वी होण्यासाठी अनेक ठिकाणी देशभरातील विविध ठिकाणी होमहवन करण्यात आले. गणपतीला अभिषेक करण्यात आला. प्रार्थना करण्यात आल्या. दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग करणारा भारत पहिलाच देश ठरला आहे. तसेच भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सेफ लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे.
चांद्रयान 3 पहा थेट प्रक्षेपण
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0vAeRghJ9zCFuY3dkezuvY2BiTAsEzmj3VvKd4EGpmGU2w1pHh8XaakUz8DTgNZyDl&id=100069310668211&mibextid=ZbWKwL