---Advertisement---

जाणून घ्या; एप्रिल फुल चा इतिहास

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । १ एप्रिल २०२३। जगभरात 1 एप्रिल हा दिवस एप्रिल फुल डे साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण एकमेकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. सुरवातीला हा दिवस फक्त फ्रान्स आणि अन्य युरोपीय देशांमध्ये साजरा केला जायचा पण नंतर अन्य देशांमध्येही हा दिवस साजरा केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का?  हा दिवस साजरा करण्याची सुरवात केव्हा आणि कुठे झाली? हा दिवस साजरा करण्यामागे काय उद्देश होता? एप्रिल फुल चा इतिहास जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

एप्रिल फूल डे साजरा करण्याची सुरवात ही १३८१ मध्ये झाली. त्यावेळचे राजा रिचर्ड जीती आणि बोहेमियाची राणी अॅनीने लोकांसमोर घोषणा केली की ते ३२ मार्च १३८१ साखरपुडा करणार. या बातमीला ऐकताच जनता आनंदी झाली आणि 31 मार्चची आतुरतेने वाट पाहू लागली.

मात्र जेव्हा ३१ मार्चचा दिवस आला, तेव्हा लोकांना कळले की ३२ मार्च हा दिवसच नसतो. तेव्हा त्यांना कळले की राजा-राणीने त्यांना मूर्ख बनविले. त्यानंतर ३२ मार्च हा 1 एप्रिल मूर्ख दिवस म्हणून साजरा करू लागले. भारतातही एप्रिल फूल उत्साहाने साजरा केला जातो. अनेकजण आपले मित्रमैत्रीणी, आप्तस्वकीय, कुटुंब यांच्यासोबत एप्रिल फुल दिवसानिमित्त गम्मत जम्मत करतात. त्यांना मुर्ख बनवतात आणि हॅप्पी एप्रिल फुल म्हणून शुभेच्छा देतात.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment