---Advertisement---

Home Loan Tips : गृहकर्ज घेताय? मग जाणून घ्या ‘या’ टिप्स, अन्यथा बसेल आर्थिक फटका

---Advertisement---

Home Loan Tips : स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र, सध्या घराच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वांना रोख पैशातून घर घेता येत नाही. त्यामुळे अनेक जण गृहकर्ज घेत असतात. पण गृहकर्ज घेण्याची प्रक्रिया करण्याअगोदर एकदा काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे. कारण अनेकवेळा नियोजन चुकल्याने आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गृहकर्ज घेण्याच्या काही आर्थिक टिप्स. कोणत्या आहेत ‘या’ टिप्स चला जाणून घेऊया.

इतका असावा ईएमआय

गृहकर्ज हा व्यक्तीच्या जीवनातील महत्वाचा विषय आहे. त्यामुळे गृहकर्ज घेताना सखोल विचार केला पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींबाबत सर्व माहिती असली पाहिजे. गृहकर्ज घेताना आपली आर्थिक बाजू लक्षात घेत गृहकर्जाचा ईएमआय तुमच्या पगाराच्या ४०% पेक्षा जास्त नसवा. पगाराच्या ४०% पेक्षा जास्त ईएमआय असल्यास या परिणाम तुमच्या दैनंदिन बजेटवर होईल.

लिक्विड ॲसेट

गृहकर्ज घेत असताना अनेकगोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यापैकी एक म्हणजे लिक्विड ॲसेट. लिक्विड ॲसेट म्हणजे अशी मालमत्ता ज्याद्वारे तुम्ही गरजेनुसार पैसे उभारू शकतात. म्हणजेच ती मालमत्ता विकून तुम्ही आर्थिक प्रश्न सोडवू शकाल. त्यामुळे तुमच्याकडे अशी लिक्विड ॲसेट असली पाहिजे जी तुम्हाला आर्थिक अडचणीच्यावेळीस लगेच पैसे उभे करून देऊ शकेल.

कर्जाची परतफेड

गृहकर्ज घेण्याबरोबरच ते फेडणेही मोठी जबाबदारी आहे. गृहकर्जाचे हप्ते नियमित न फेडल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गृहकर्ज घेण्यापूर्वी किमान तीन महिन्यांसाठी कर्जाचे ईएमआय भरण्याचा सराव करा. यामुळे तुम्हाला तुमच्या इतर खर्चासह अंदाज, तसेच गृहकर्जाचे गणित लक्षात येईल. हे करत असताना तुम्हाला तुम्ही कर्जाचे हप्ते फेडण्यास किती सक्षम आहात हे लक्षात येईल.

इतर खर्च

तसेच तुम्ही गृहकर्ज घेत असताना इतर खर्चाची काळजी घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून ईएमआयचा तुमच्या इतर खर्चावर परिणाम होणार नाही.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment