---Advertisement---
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक सोमवारपासून सुरू झाली असून, ६ ऑगस्टला आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा बैठकीतील निर्णयांची माहिती देणार आहेत. या बैठकीत आरबीआय रेपो दरात आणखी ०.२५% कपात करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तत्पूर्वी या वर्षीच तीन वेळा मिळून १% दर कपात आधीच झाली आहे. सध्या रेपो दर ५.५०% असून, त्यात आणखी कपात झाली, तर गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार!
न्यूयॉर्क : ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज तब्बल ५.४७ लाख बॅरलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल, डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. रशिया, सौदी अरेबियासह प्रमुख उत्पादक देशांनी सप्टेंबरपासून उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने भारतासारख्या देशांना मोठा फायदा होऊ शकतो.