न्यू होंडा ऍक्टिव्हा स्कूटर आहे अधिकच स्मार्ट

तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। होंडा कंपनीने न्यू होंडा ऍक्टिव्हा स्मार्ट स्कूटर लाँच केली आहे. त्यात अनेक स्मार्ट असे फीचर्स उपलब्ध आहेत म्हणजे, तुम्ही स्कूटरला लॉक अनलॉक, स्टार्ट, बूट स्पेस ऍक्सेस आणि फ्यूल लीडला ओपन करू शकता. ही स्कूटर एच स्मार्ट टेक्नोलॉजी मध्ये खूप शानदार आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा तुमच्याकडे उत्तम पर्याय आहे. या स्कूटरची किंमत आणि फीचर्स बदल जाणून घ्या तरुण भारत’च्या माध्यमातून.

भारतातात सर्वात जास्त विकली जाणारी स्कूटर होंडा ऍक्टिव्हा ही स्कूटर आता जास्त स्मार्ट झालेली आहे. या स्कूटर मध्ये अनेक स्मार्ट फीचर्स आपल्याला पहायला मिळतात. ही स्कूटर विना चावी स्टार्ट होऊ शकते. तसेच या स्कूटर मध्ये अडवॉन्स्ड सिक्योरिटी सिस्टम दिली आहे. ज्यात ‘H-Smart’ नावाचा ट्रेडमार्क करण्यात आले आहे.

होंडा ऍक्टिव्हा स्कूटरची किंमत ८० हजार ५३७ रुपये एक्स शोरूम आहे. तुम्ही स्कूटरला लॉक अनलॉक, स्टार्ट, बूट स्पेस ऍक्सेस आणि फ्यूल लीडला ओपन करू शकता. ही स्कूटर एच स्मार्ट टेक्नोलॉजी मध्ये खूप शानदार आहे. होंडा ऍक्टिव्हा ६ जीच्या दोन्ही व्हेरियंट ऍक्टिव्हा ६जी स्टँडर्ड आणि ऍक्टिव्हा ६जी डीलक्सच्या किंमतीत १ हजार १७७ रुपयाची वाढ करण्यात आली आहे. याची किंमत  अनुक्रमे ७४ हजार ५३६ आणि ७७ हजार ३६ रुपये (एक्स शोरूम) आहे. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर होंडा ऍक्टिव्हा स्मार्ट स्कूटर हा उत्तम पर्याय असू शकतो.