तरुण भारत लाईव्ह ।१८ फेब्रुवारी २०२३। जपानी दुचाकी उत्पादक कंपनी होंडा ने नवीन स्कूटर Honda Scoopy लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटरचा लुक आणि डिझाईन खूपच आकर्षक आहे. या स्कूटरचे फीचर्स आणि किंमत जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कंपनीने सध्या इंडोनेशियन बाजारात Honda Scoopy लाँच केली आहे. याचे फीचर्स असे कि, या स्कूटरला रेट्रो लुकसह प्रगत वैशिष्ट्यांची जोड देऊन तयार करण्यात आले आहे. याला एक मोठा ओव्हल हेडलाइट, एलईडी लाइटिंग आणि लांब आसनासह एक चांगला फुल बोर्ड मिळतो. जे लांब अंतर आरामदायी बनवण्यातही मदत करते. कंपनीचा दावा आहे की तिची सीट पोझिशनिंग जास्त चांगली आहे, जी सिटी राईडसाठी योग्य आहे.
कंपनीने यामध्ये ११० cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे ९ bhp पॉवर आणि ९.३ Nm टॉर्क जनरेट करते. CVT गिअरबॉक्सने सुसज्ज असलेल्या या स्कूटरला Honda Activa प्रमाणे स्मार्ट की देखील देण्यात आली आहे. इंडोनेशियन बाजारात Honda Scoopy ची किंमत २,१६,५३,०० इंडोनेशियन रुपयांवर निश्चित करण्यात आली आहे, जी भारतीय चलनात रूपांतरित केल्यावर सुमारे १.१७ लाख असेल.