Honor Killing : मुलीचं प्रेमप्रकरण, समाजात बदनामीच्या भीतीने वडिलांचं धक्कादायक कृत्य

---Advertisement---

 

Honor Killing : ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलीच्या प्रेम प्रकरणाने समाजात बदनामी होईल या भीतीने वडिलांनी स्वतःच्या मुलीचा गळा दाबून खून केला. यानंतर हा खून लपविण्यासाठी त्याने मुलीने गळफास घेतल्याचा बनाव उभा केला. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

हा खून शुक्रवारी (५ सप्टेंबर) करण्यात आला. बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे रात्रीच्या वेळी गस्ती पोलीस गस्त घालत होते. यावेळी गस्ती पथकातील बदनापूरचे उपनिरीक्षक संतोष कुकरे यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांना दावलवाडी गावातील हरी बाबुराव जोगदंड यांच्या मुलीने गळफास घेतला असल्याचे समजले. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक संतोष कुकरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रकरणाची सखोल चौकशी केली असता. या चौकशीत मुलीने आत्महत्या केली नसून तिचा मृत्यू इतर काही कारणाने झाला असल्याचे समोर आले.

यानंतर बदनापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक एम.टी. सुरवसे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. तपासात मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. तिच्या वडिलांना हे प्रेमसंबंध आवडले नाही. समाजात आपली बदनामी होईल या भीतीने त्यांनी स्वतःच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचे आढळून आले.

या खुनाची माहिती लपवण्यासाठी वडिलांनी मुलीच्या गळ्यात दोरी बांधून तिला फाशी दिली. मुलीचा मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आणि मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, ज्यामध्ये मुलीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे आढळून आले. यानंतर, आरोपी वडील हरी बाबुराव जोगदंड यांना ताब्यात घेण्यात आले आणि पोस्ट बदनापूर येथे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---