तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। देहुनगरीतला तुकाराम बीज सोहळा संपन्न करुन त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, देहू ड्थून पुणे-नाशिक महामार्गावरुन त्र्यंबकेश्वर येथे पिकअप जीपमधून 27 पुरुष-महिला वारकरी जात होते. दरम्यान मंचरजवळील एकलहरे येथे लघुशंकेसाठी खाली उतरले असताना मंचरवरुन नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने वारकऱ्यांना उडवले. या अपघातात वारकर्यांचा जागीच मृत्यू असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दिलीप सुतार असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव असून एसटी बस चालकाला मंचर पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.