तरुण भारत लाईव्ह । २२ मार्च २०२३ । संध्याकाळच्या वेळेला भूक लागते तर अशावेळी मुगाच्या डाळींची भजी हा पदार्थ तुम्ही बनवू शकता. मुगाच्या डाळींची भाजी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
हिरवी मूग डाळ, कोथिंबीर, लसूूण पेस्ट, आल्याची पेस्ट, हिरव्या मिरच्या, शेंगदाण्याचे तेल, मीठ, धणे, पाणी
कृती
सर्वप्रथम, एका बाउलमध्ये मूग डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवा. अंदाजे तीन ते चार तास मूग डाळ भिजत ठेवावी. यानंतर मिक्सर भांड्यामध्ये भिजलेली मूग डाळ, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, आले आणि लसूणची पेस्ट वाटून घ्या आणि जाडसर पेस्ट तयार करा. भजीचे पीठ तयार झाल्यानंतर त्यामध्ये कापलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट आणि अन्य सामग्री मिक्स करून घ्या. आता भजीच्या पिठामध्ये अर्धा चमचा तेल मिक्स करा आणि सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यावी. भजी तळण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर भजी तळा आणि गरमागरम मूगडाळीची भजी सर्व्ह करा.