गरमागरम बटाटे वडे; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह । १८ एप्रिल २०२३। ऋतू कोणताही असो ‘बटाटा वडा’ आवडीने खाल्ला जातो. बटाटा वडा घरी बनवायला अगदी सोप्पा आहे. बटाटा वडा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
2 कप बेसन, 3 चमचे तांदळाचं पीठ, आवश्यकतेनुसार मीठ, 1 चमचे मोहरीच्या बिया, 6/7 – हिरव्या मिरच्या, 2 चमचे कोथिंबीरीची पाने, 4 मध्यम बटाटे , हळद, 1 चमचे मिरची पावडर, 1 कप पाणी, हिंग, 2 चमचे शेंगदाण्याचे तेल.

कृती
सर्वप्रथम, एका भांड्यामध्ये उकडलेले बटाटे घ्या आणि मॅश करा. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यामध्ये हिंग, मोहरी, हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. सर्व सामग्री दोन मिनिटांसाठी फ्राय करा. फ्राय केलेली सामग्री मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करा. यामध्ये हळद आणि चिरलेली कोंथिबीर देखील टाका. चवीनुसार मीठही त्यात घालावे. सर्व सामग्री एकजीव करून घेतल्यानंतर आता छोट्या-छोट्या आकाराचे वडे तयार करून घ्या. तयार केलेले वडे बाजूला ठेवून द्या.

एका बाउलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, एक चमचा मीठ, चिमूटभर हळद आणि लाल तिखट एकत्र घ्या. यामध्ये पाणी ओता आणि सर्व सामग्री नीट मिक्स करा. जाडसर पीठ तयार करून घ्या. तयार केलेले वडे बेसनच्या पिठात बुडवून तेलामध्ये तळून घ्या. बटाटे वडे चांगल्या पद्धतीने फ्राय करून गरमागरम बटाटे वडे सर्व्ह करा.