Hotel Booking Tips : पर्यटन किंवा प्रवासादरम्यान अनेकजण उत्तम सोयी-सुविधा असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याला प्राधान्य देतात. सध्या ऑनलाईन बुकिंग साईट्स आणि ॲप्समुळे हॉटेल बुक करणे सोपे झाले आहे. मात्र, केवळ स्वस्तात मिळणाऱ्या डील्सच्या मागे लागण्याऐवजी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. हॉटेल निवडताना आणि रूम बुक करताना काही प्रकारच्या खोल्या टाळाव्यात. अन्यथा, तुमचा प्रवास त्रासदायक ठरू शकतो. नेमक्या कोणत्या खोल्या टाळावयाच्या? हे जाणून घेऊया…
हॉटेलमध्ये लिफ्ट हा सर्वाधिक वापरला जाणारा भाग असतो. त्यामुळे लिफ्टच्या जवळ असलेल्या खोल्यांमध्ये सतत वर्दळ असते. याचा परिणाम म्हणजे झोपमोड होऊ शकते. तसेच, एकांताची कमतरता जाणवू शकते. जर तुम्हाला शांत वातावरण हवे असेल, तर अशा खोलीचे बुकिंग टाळावे.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरील रूम घेताना विशेष काळजी घ्या. कारण आपत्कालीन परिस्थितीत, विशेषतः आग लागल्यास, चौथ्या मजल्यावरून बाहेर पडणे कठीण होते. अग्निशमन दलालाही अशा ठिकाणी मदत पोहोचवताना अडचणी येतात. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने चौथ्या मजल्यावर रूम घेणे टाळावे.
हॉटेलच्या किचन, पँट्री किंवा रेस्टॉरंटजवळील रूम घेतल्यास सततचा आवाज आणि जेवणाचा वास यामुळे अस्वस्थ वाटू शकते. शिवाय, स्टाफ आणि ग्राहकांची वर्दळ असल्याने अशा ठिकाणी शांतता मिळत नाही.
काही वेळा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या खोल्या दर्जाहीन असतात. त्यामध्ये स्वच्छतेची योग्य काळजी घेतली जात नाही. तसेच, अशा रूममध्ये सुरक्षेचा अभाव असतो. त्यामुळे कोणत्याही ऑफरवर आकर्षित न होता हॉटेलची रेप्युटेशन आणि रेटिंग तपासूनच बुकिंग करावे.
वेळेवर करा बुकिंग : हॉटेल बुक करण्यासाठी सकाळी किंवा ऐन वेळी बुकिंग करणे टाळा. प्लॅन ठरताच बुकिंग करावे, त्यामुळे अधिक चांगल्या ऑफर मिळू शकतात.
ऑनलाईन आणि ॲप्सवर करा बुकिंग : अनेक ट्रॅव्हल ॲप्स आणि वेबसाईट्सवर मोठ्या सवलती व आकर्षक ऑफर्स मिळतात. त्यामुळे त्यांचा फायदा घ्या.
थेट हॉटेलशी करा संपर्क : घरगुती किंवा मोठे कार्यक्रम असल्यास ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष हॉटेलला जाऊन बुकिंग करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे तुमच्या गरजेनुसार योग्य खोल्या निवडता येतात.
संपर्क करण्यापूर्वी काय तपासावे?
हॉटेलचे रिव्ह्यू आणि रेटिंग
सुरक्षा आणि स्वच्छता उपाय
आसपासची सुविधा आणि कनेक्टिव्हिटी
बदल किंवा रद्द करण्याची पॉलिसी