हॉटेल स्टाइल दाल मखनी; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। दाल मखनी ही उत्तर भारतातील लोकप्रिय रेसिपी आहे. हा पदार्थ पंजाब आणि उत्तर भारतातील अन्य भागांमध्येही आवडीने खाल्ला जातो. हा पदार्थ तुम्ही घरी करून देखील खाऊ शकता. दाल मखनी हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
उडदाची डाळ, रेड किडनी बीन्स, कांदा, टोमॅटो पेस्ट, हळद, मिरची पावडर, कोथिंबीर पेस्ट, आले, लसूण, जिरे, मीठ, मोहरीचे तेल, शेंगदाण्याचे तेल, हिरव्या मिरच्या

कृती
सर्वप्रथम, गॅसवर कूकर गरम करत ठेवा. यानंतर त्यात एक कप स्वच्छ धुतलेली उडदाची डाळ, राजमा, आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि सर्व सामग्री उकळून घ्या. पाणी उकळल्यानंतर त्यात एक चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मोहरीचे तेल टाका. सात ते आठ शिट्ट्या येईपर्यंत सामग्री शिजू द्यावी.
दुसऱ्या कढईत दोन चमचे तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या, आले टाका. आता त्यात कपभर चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतून झाल्यावर त्यात एक चमचा जिरे घालावे. कांद्याचा रंग हलका चॉकलेटी होईपर्यंत सर्व सामग्री फ्राय करत राहा.
यानंतर कढईमध्ये टोमॅटोची पेस्ट घाला, सर्व पदार्थ तीन ते चार मिनिटांसाठी शिजू द्या. आता त्यात एक चमचा चिरलेली हिरवी मिरची, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धणे पूड देखील मिक्स करा. दाल मखनीचा मसाला तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा.कूकरच्या सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर त्यावरील झाकण काढा आणि शिजलेली डाळ कढईतील मसाल्यामध्ये मिक्स करा आणि सर्व्ह करा डाल मखनी