तरुण भारत लाईव्ह । ४ एप्रिल २०२३। जीरा राइस हा अतिशय लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे. तांदूळ आणि जिऱ्यापासून ही खमंग डिश तयार केली जाते. हा भात काही मिनिटांतच झटपट तयार होतो. जीरा राईस घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
1 कप तांदूळ, 2 कप पाणी, 3/4 – हिरव्या मिरच्या, 1 चमचे जिरे, 1 चमचे तूप, आवश्यकतेनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम, कुकरमध्ये एक चमचा तूप गरम करत ठेवा. तुपात जिरे आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या फ्राय करा. यानंतर पॅनमध्ये भिजवलेले तांदूळ मिक्स करा. सर्व सामग्री नीट ढवळा. यानंतर चवीनुसार मीठा टाका. दोन कप पाणी ओतून सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करा. कुकरचं झाकण लावा. दोन ते तीन शिट्या होईपर्यंत भात शिजू द्यावा. गॅस बंद करा आणि कुकर थंड होऊ द्या. दुसऱ्या पॅनमध्ये तुपात काजू फ्राय करून घ्या. फ्राय केलेल्या काजूचा गार्निशिंगसाठी उपयोग करावा. शिजवलेला भात एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यावा. खमंग जीरा राइस तयार आहे.