तरुण भारत लाईव्ह । १७ मार्च २०२३ । रोजच एकच भाजी खायला आवडते अशी व्यक्ती कुणीही नसेल. प्रत्येकाला दिवसाला एक विशेष भाजी हवी असते. घरी तशी भाजी तयार नसेल तर कुणी हॉटेल गाठतं. कुणी रेसिपीच्या माध्यमातून घरीच भाजी बनवत असतं आणि जेवणाचा मस्त आस्वाद घेत असतो. अशीच एक सगळ्यांना आवडेल अशी पालक भाजी ती म्हणजे पालक पनीर. चला तर जाणून घेऊयात पालक पनीर ची भाजी कशी बनवली जाते.
साहित्य
2 कप पालक, 1 कप शुद्ध कांदा, 1 चमचे फ्रेश क्रीम, 1 कप टोमॅटो पेस्ट, १ चमचे जिरे, 1 चमचे रेड चिली पावडर, 1 चमचे तूप, 1 चमचे लसूण, आवश्यकतेनुसार मीठ, आवश्यकतेनुसार हिरव्या मिरच्या, 250 ग्रॅम पनीर, आवश्यकतेनुसार पाणी
कृती
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून ५ मिनिटे उकळत्या पाण्यात शिजवून घ्या. पुढे, साधारण तापमानावर ती थंड करा. आता त्यात २ हिरव्या मिरच्या घालून त्याची मिक्सरमध्ये पातळ पेस्ट करुन घ्या. एका पॅनमध्ये साजूक तूप, अर्धा चमचा जीरे आणि बारीक चिरलेले लसूण घाला व त्यात कांद्याची पेस्ट घालून मिश्रण दोन मिनिटे चांगले परतून घ्या. आता मिश्रणात टोमॅटोची पेस्ट घालून सर्व सामग्री मंद आचेवर ४ ते ५ मिनिटे परतून घ्या. पुढे, त्या मीठ, लाल तिखट घाला व ३ ते ४ मिनिटे शिजवून घ्या. आता मिश्रणात पालकची पेस्ट घालून सर्व सामग्री व्यवस्थित मिक्स करुन ३ ते ४ मिनिटे शिजवा. त्यात थोडं पाणी देखील मिक्स करा. आता तयार झालेल्या पेस्टमध्ये ताज्या पनीरचे तुकडे घालून दोन मिनिटे शिजवून घ्या आणि सर्व्ह करा पालक पनीर.