सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सध्या एका एसटी चालकाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एसटी चालकाने एसटी गाड्यांमध्ये चढण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी हसत हसत उघड केल्या आहेत.
व्हिडीओत शिवशाही एसटी गाड्यांच्या डिझाइनची मजेशीर बाजू मांडण्यात आली आहे. चालक सांगतो की, गाडीच्या केबिनमध्ये चढण्यासाठी टप्पे एका बाजूला आहेत, तर गाडीचा दरवाजा दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे तो प्रश्न विचारतो, “आता मी या पायरीवरून गाडीत कसा चढू?”
हेही वाचा : शेतकऱ्यांनो, लक्ष द्या ! ‘या’ नोंदणीसाठी उरले फक्त दोन दिवस
चालकाचा हा गमतीशीर परंतु विचार करायला लावणारा प्रश्न लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवत आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळाच्या डिझाइनमधील त्रुटींवरही प्रश्नचिन्ह उभे करत आहे.
हा व्हिडीओ ट्विटरवर “Shekhar p” या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत १३ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५०० पेक्षा अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे.
अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही .
परिवहन मंत्री कोणी असेल त्याला या बस मध्ये चढायला लावा .
सुधारा रे मंद बैलांनो 😂
माझा दादा चढेल कसा आणी कुठून 😡😡. pic.twitter.com/2f4wFdI57z— Shekhar P (@Godfath52464383) January 13, 2025
सोशल मीडियावर यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने कमेंट केली, “बस गमतीशीर बनवली आहे.. उगाच ड्रायव्हरला दोष देवून काय फायदा?” तर दुसऱ्याने विचारले, “असे डिझाइन करण्याचे अजब डोकं कोणाचे?”
या व्हिडीओने एसटी गाड्यांच्या डिझाइनच्या त्रुटींबाबत गंभीर चर्चा घडवून आणली असून, एसटी महामंडळाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.