भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे किती रुग्ण आढळले?

मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनामुळे सर्वसामान्याची चिंता वाढली आहे. भारतात कोरोना विषाणूचे रूग्ण वाढू लागले आहेत. सध्या देशात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १८ हजारांहून अधिक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील दिवसांच्या तुलनेत २ एप्रिल रोजी भारतात कोविड-१९ रूग्णांची संख्या २८ टक्के वाढली आहे.

गेल्या २४ तासात ३८०० हून अधिक नवीन कोविड-१९ प्रकरण आढळली आहेत. देशात कोरोना बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४,४१,७३,३३५ (९८.७७%) झाली आहे. देशात कोविडमुळे मृतांची संख्या ५,३०,८८१ झाली आहे.भारतातील कोरोना लसीकरणाबद्दल बोलायचे झाले तर, १६ जानेवारी २०२१ पासून सुरू झालेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत २.२ अब्जाहून अधिक लोकांनी लसीचा डोस घेतला आहे. गेल्या २४ तासांत २,७९९ जणांचे लसीकरण करण्यात आले.