---Advertisement---
---Advertisement---
8th Pay Commission : जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि जॉइन झाल्यानंतर तुम्हाला किती पगार मिळेल असा प्रश्न विचारत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आठव्या वेतन आयोगाच्या तयारीला वेग आला आहे.
सध्या रेल्वेसह इतर केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार पगार दिला जात आहे. सध्या, सर्वात कमी स्तरावर (लेव्हल-१) नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १८,००० रुपये मूळ पगार मिळतो. यामध्ये डीए (महंगाई भत्ता), एचआरए (घरभाडे भत्ता) आणि इतर भत्ते जोडल्यास एकूण इन-हँड पगार सुमारे ३०,००० ते ३२,००० रुपये होतो.
सातव्या वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांच्या पगाराची गणना करण्यासाठी २.५७ चा फिटमेंट फॅक्टर निश्चित करण्यात आला होता, ज्याच्या आधारावर किमान मूळ पगार १८ हजार रुपये ठेवण्यात आला होता. आता असा अंदाज लावला जात आहे की जर आठव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर २.५७ पेक्षा जास्त केला गेला तर मूळ पगारातही चांगली वाढ दिसून येईल.
आठव्या वेतन आयोगामुळे काय होईल बदल ?
वृत्तानुसार, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर मूळ पगार १८,००० रुपयांवरून थेट २६,००० रुपयांपर्यंत होऊ शकतो. इतर भत्ते देखील वाढतील, ज्यामुळे एकूण इन-हँड पगार सुमारे ४५,००० ते ५०,००० रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
रेल्वेमध्ये पगारासोबत इतर फायदे
केवळ पगारच नव्हे तर रेल्वे कर्मचाऱ्यांना इतर अनेक सुविधा देखील मिळतात. जसे की मोफत रेल्वे प्रवास पास, सरकारी निवास व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पेन्शन (एनपीएस) आणि मुलांच्या शिक्षणात मदत इ. अशा परिस्थितीत रेल्वे नोकरीकडे एक स्थिर आणि सुरक्षित करिअर म्हणून पाहिले जाते.