नारळाचे लाडू घरी कसे बनवाल?

तरुण भारत लाईव्ह । ८ मार्च २०२३। आज जागतिक महिला दिनानिम्मित आपल्या आई ला सरप्राईझ म्हणून आपण घरात काही गोड करू शकतो. तुम्ही घरी नारळाचे लाडू बनवू शकता हे घरी बनवायला खूप सोप्पे आहे. नारळाचे लाडू घरी कसे बनवले जातात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
नारळाचा किस, कंडेन्स्ड मिल्क, वेलची पावडर, बदाम

कृती
एका पातेल्यात नारळाचा किस घ्या आणि मंद आचेवर भाजायला सुरुवात करा. त्यातून हलका सुगंध येण्यास सुरुवात झाली की त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि वेलची पावडर घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट होऊन एकत्र येईपर्यंत थोडावेळ मंद आचेवर शिजवा. या मिश्रणाची एकसंधता सारखी झाल्यावर गॅस बंद करा. यानंतर तळहातावर थोडे तूप लावून मिश्रण थोडे थोडे घेऊन लाडूचा आकार द्या. आता प्रत्येक लाडूवर बदामाचा तुकडा लावा. तुमचा नारळाचा लाडू तयार आहे.