उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल?

तरुण भारत लाईव्ह ।२१ मार्च २०२३। गुडीपाडव्यानंतर तापमानात प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे प्रकृतीसोबतच उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यावी लागणार आहे. उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, त्वचेवर काळे डाग, अथवा चट्टे पडणे, त्वचा तेलकट अथवा कोरडी पडणे, त्वचेवर पुरळ येणे, घामोळे येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याची खास गरज असते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घ्या  तरुण भारतच्या माध्यमातून

उन्हाळयात शरीर आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी प्यावे. तसेच आरामदायक कपडे वापरावेत. नॉर्मल त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमीत त्वचेवर टॉमेटोचा  गर लावू शकता. त्वचेवर बटाटाच्याचा रस लावल्याने त्वचेला नैसर्गिक ब्लिचिंग घटक मिळतात त्यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते.

आहार काय घ्याल? 
त्वचेच्या दृष्टीने या ऋतूत महत्वाची गोष्ट म्हणजे आहार, उन्हाळ्यात अधिक शाकाहार घेणे योग्य तसेच फळांचे सेवनही फायदेशीर ठरते. हिरव्या पालभांज्याचे सेवनही तेवढेच फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात पचनशक्ती कमी होत असल्याने आहारावरही नियंत्रण ठेवावे. सहज पचणाऱ्या खाद्याला पसंती द्यावी.