तुफान राडा : फुकट सूपचा ऑफर, ग्राहकांचा मोठा प्रतिसाद, शेजारींच्या मनात राग, चक्क डोक्यात लोखंडी हत्यार..

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्राहकांना फुकट सूपच्या ऑफरवरून एका हॉटेल मालकाने चक्क त्या हॉटेल मालकाला हॉटेलचालकाच्या डोक्यात हत्याराने वार केल्याची धककदायक घटना घडली आहे.  याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून हे प्रकरण झाल्याचे कळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सुत्रानुसार, पाल यांचे खडकी बाजार परिसरात ‘ओ शेठ’ नावाचे हॉटेल आहे. त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फुकट सूप देण्याची योजना सुरू केली. या योजनेला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. याचा परिणाम शेजारी असणाऱ्या हॉटेल्सवर होत असल्याचे दिसून आले.

आरोपी भालेराव आणि गजरे याचे त्याच परिसरात साहेब नावाचे खाद्यपदार्थ विक्रीची गाडी आहे. पाल यांच्याकडे ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यामुळे दोघांच्या ही मनात पाल यांच्या विषयी राग होता. या वादातून आरोपींनी पाल यांला मारहाण करून डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले ज्यात पाल हे गंभीर जखमी झाले.

तक्रारदार हॉटेल चालकावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू असून खडकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी सिद्धार्थ भालेराव आणि दिग्विजय गजरे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.