तान्हाजी: द अनसंग वॉरियरच्या जबरदस्त यशानंतर, अजय देवगण आता दिग्दर्शक ओम राऊतसोबत आणखी एका अनसंग वॉरियर चित्रपटावर काम करत आहे. या प्रोजेक्टमध्ये ओम राऊत आणि अजय देवगण हे अभिनेता हृतिक रोशनचाही समावेश करणार असल्याचं समजतंय.
रिपोर्टनुसार, अभिनेता अजय देवगण आणि दिग्दर्शक ओम राऊत बाजी प्रभूची कथा मोठ्या प्रमाणावर आणण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात हृतिक रोशनही दिसणार आहे. या चित्रपटात हृतिक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिकचा करिष्मा आणि अभिनयाची ताकद या प्रकल्पाला अधिक सामर्थ्यवान बनवेल. असा विश्वास अभिनेता अजय देवगण यांनी व्यक्त केला आहे.
तान्हाजीबद्दल बोलायचे झाले तर अजय देवगणने चित्रपटात तानाजीची भूमिका साकारली होती तर सैफ अली खान उदयभान सिंह राठौरच्या भूमिकेत दिसला होता. अजयला या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात सैफचेही खूप कौतुक झाले होते.
अहवालात असेही म्हटले आहे की “अजयला वाटते की हृतिककडे जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स आणि करिश्मा आहे. त्याच्या अभिनय कौशल्याची सांगड घातल्यास, सुपरस्टार अजयच्या पात्रासाठी एक मोठा प्रतिस्पर्धी ठरेल.” तान्हाजी: द अनसंग वॉरियर मधील त्यांच्या भूमिकेनंतर शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पुन्हा साकारतील अशी अपेक्षा आहे. मात्र, अजय देवगण आणि हृतिक रोशन यांच्याकडून अद्याप कोणतीही पुष्टी आलेली नाही. ओम राऊत यांनी यापूर्वी आदिपुरुष हा चित्रपट बनवला होता . 600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ ठरला होता.