HRS ALUGLAZAE LTD ची शेअर बाजारात मजबूत सुरुवात; गुजरातमध्ये नवीन प्लांट उभारण्याची घोषणा

---Advertisement---

 

HRS ALUGLAZAE LTD IPO : शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. HRS ALUGLAZAE LTD या कंपनीने शेअर बाजारात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच लक्ष वेधून घेतले आहे. आयपीओ किमतीच्या तुलनेत कंपनीचा शेअर सुमारे ५२ टक्क्यांनी वाढला असून, याच दरम्यान गुजरातमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.

HRS ALUGLAZAE LTD ने गुजरातच्या राजोदा येथे नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रकल्पासाठी कंपनी सुमारे १६ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, पुढील १५ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या बांधकामासाठी चावडा इन्फ्रा लिमिटेड या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे.

कंपनीची १८ डिसेंबर रोजी BSE SME प्लॅटफॉर्मवर नोंदणी झाली. ९६ रुपये आयपीओ किमतीच्या या शेअरने १२६ रुपयांवर बाजारात प्रवेश केला. त्यानंतर सोमवारी (२२ डिसेंबर) शेअरचा भाव १४६ रुपयांपर्यंत पोहोचला. त्यामुळे काही दिवसांतच आयपीओ किमतीपेक्षा सुमारे ५२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

कंपनीचे व्यव्स्थाकीय यांच्या मते, या नवीन प्रकल्पामुळे उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यात अधिक मोठे प्रकल्प हाती घेण्याची क्षमता निर्माण होईल. कंपनीच्या दीघर्काली व्हिस्टाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---