---Advertisement---

Champions Trophy 2025 : तर टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून होऊ शकते बाहेर, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!

---Advertisement---

टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध ICC स्पर्धेतील विजयी परंपरा कायम राखत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोठा विजय मिळवला आहे. दुबईत रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला विराट कोहली, ज्याने शानदार शतक झळकावत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने सलग दोन सामने जिंकत 4 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. मात्र, या शानदार कामगिरीनंतरही टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडू शकते!

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत. सध्याच्या स्थितीत, टीम इंडिया 4 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, न्यूझीलंड 2 गुणांसह दुसऱ्या, बांग्लादेश तिसऱ्या, आणि पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तानने अद्याप एकही सामना जिंकलेला नाही.

टीम इंडियाच्या विजयामुळे सेमीफायनलचे दार जवळपास उघडले आहे, पण अजून तीन महत्त्वाचे सामने बाकी आहेत. पुढील सामन्यात न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात सामना रंगणार आहे. जर बांग्लादेश हा सामना जिंकून, पाकिस्तानलाही पराभूत केलं, तर त्यांचे 4 गुण होतील. न्यूझीलंडने भारताविरुद्ध शेवटचा सामना जिंकला, तर त्यांचेही 4 गुण होतील. अशा परिस्थितीत तीन संघांचे समान 4 गुण होतील आणि सेमीफायनलमध्ये कोण प्रवेश करणार हे ‘नेट रनरेट’ ठरवेल.

भारताचा सध्याचा रनरेट +0.647 आहे, न्यूझीलंडचा +1.200 तर बांग्लादेशचा -0.408 आहे. जर बांग्लादेशाने मोठ्या फरकाने विजय मिळवले, तर त्यांचा रनरेट सुधारू शकतो. त्याच वेळी, जर न्यूझीलंडने भारतावर मोठ्या फरकाने विजय मिळवला, तर भारताचा रनरेट खाली येईल आणि टीम इंडिया सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकते.

आज, 24 फेब्रुवारीला न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यात महत्त्वाचा सामना होणार आहे. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला, तर भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. मात्र, बांग्लादेश जिंकल्यास स्पर्धेचा थरार अधिक वाढणार आहे.

टीम इंडियासाठी पुढे काय?

न्यूझीलंडने बांग्लादेशला हरवल्यास – भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचतील.

बांग्लादेशने विजय मिळवला आणि पाकिस्तानलाही पराभूत केले तर – तीन संघ 4-4 गुणांवर जातील, आणि निर्णय रनरेटच्या आधारे होईल.

भारत न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने हरल्यास – टीम इंडिया बाहेर होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment