---Advertisement---

चिमुरडीवर अत्याचार करुन हत्या, पोलिसांकडून आरोपीचा एन्काऊंटर!

---Advertisement---

हुबळी : पाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा हुबळी पोलिसांनी एन्काऊंटर केलाय. रितेश कुमार (वय 35) असे एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेत तीन पोलीस कर्मचारीही जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडीची आई हुबळी परिसरात घरकाम करायची. रविवारी पीडित चिमुरडीही आईसोबत गेली होती. दरम्यान, आरोपी रितेश कुमार याने तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हे तर त्याने पीडितेची गळा दाबून हत्या केली आणि पसार झालेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु होता.

दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रितेश कुमार याला ताब्यात घेतले. अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जात होते. दरम्यान, रितेश कुमार याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून हवेत गोळी झाडली. मात्र, रितेश कुमार हा पळून जात असल्याने फौजदार अन्नपूर्णा यांनी त्याच्या पायावर आणि पाठीवर गोळ्या झाडल्या. यात जखमी झालेल्या रितेश कुमार याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्याला डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून देशात धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ऐरणीवर आला असून, छेडछाड आणि अत्याचारासारख्या भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशातच चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केल्याने नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment