Humanity : माणुसकीचे दर्शन… अन् भरकटलेल्या व्यक्तीला मिळाले घर

तळोदा : सध्याच्या आधुनिक जगात जग जवळ येत आहे, पण माणूसकी ही हरवत चालली आहे. परंतु, समाजात काही व्यक्ती आहेत ज्यांनी माणुसकी जिवंत ठेवली आहे. एक भरकटलेल्या व्यक्ती येथील तरुण रोहित सूर्यवंशी याच्याकडे आली होती. त्याने तात्काळ त्यांचा पत्ता विचारून, त्या व्यक्तीस सुखरूप त्यांच्या घरी पोहचवले. विशेषतः रोहित सूर्यवंशी या तरुणाच्या रूपात माणुसकीचे दर्शन घडले.

गेल्या अनेक दिवसांपासून एक अनोळखी व्यक्ती शहरात फिरत असल्याचे अनेक लोकांना निदर्शनात आले. त्यातील काहींनी विचारपूस केली असता त्याने ‘मी मुंबईला राहतो, पण मला इथं कोण सोडून गेले, मला काही लक्षात नाही’ असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी तिलक मेडिकल तळोदा येथे पाणी द्या, पाणी अशी विनंती करू लागला. मेडिकलचे मालक रोहित सूर्यवंशी यांनी पाणी देऊन त्यांची विचारणा केली. तुम्हाला इथं कोण सोडून गेले, त्या इसमाने पूर्ण व्यथा सांगून दाखवली. त्या इसमाची व्यथा एकूण रोहित सूर्यवंशी यांच्यातील माणुसकी जागृत झाली. त्यांनी लगेच त्या इसमाची जेवणाची सोय केली व उद्या तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवतो असे आश्वासन दिले.

६ जुलै रोजी परिधान ड्रेसेसचे मालक पियुष कोचर यांना हकीकत कळवून, त्या व्यक्तीसाठी नाईट पॅन्ट टी-शर्ट अंडरवेअर बनियान मागून दिले. तसेच त्या वस्तूचे कुठलाही पैसा हा परिधान ड्रेसेस चे मालक यांनी घेतला नाही. नंतर त्यांनी सदर इसमाची स्वच्छ आंघोळ घालून तळोदा ते नंदुरबार टॅक्सीने सोडले आणि रेल्वे स्टेशनवर टॅक्सीवाल्यांनी तिकीट काढून दिले तदनंतर त्यांना जाताना एक चिठ्ठी लिहून दिली होती. मुंबईला पोचले असता या नंबर वर संपर्क करणे की मी पोहोचलो.

तसेच तो व्यक्ती मुंबईला पोहोचल्यानंतर त्यांच्या मित्रासमवेत एक फोटो घेऊन रोहित सूर्यवंशी यांना भ्रमणध्वनी द्वारे की मी सुखरूप मुंबईला पोहोचलो. सध्याच्या या आधुनिक जगात जग जवळ येत आहे पण माणूसकी हरवत चालली आहे .पण रोहित सूर्यवंशी यांनी दाखवलेली माणुसकीमुळे एक भटकलेल्या व्यक्तीस घरी पोहचवण्यास नक्की मदत झाली आहे.