---Advertisement---
Crime News : पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतापलेल्या पतीने थेट तिचे नाक कापले. यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला लखनऊ येथे रेफर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रानुसार, दोन मुलांची आई असलेली महिला तिचा प्रियकर सुशीलला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. याची माहिती तिच्या पतीला मिळताच तोही प्रियकराच्या घरी पोहोचला आणि दोघांनाही नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले. त्यानंतर संतापलेल्या पतीने थेट पत्नीचे नाक कापले.
---Advertisement---
यामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेला गावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला लखनऊ येथे रेफर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. उत्तर प्रदेशच्या हरदोई येथे ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप
दुसरीकडे, महिलेने तिचा पती आणि सासरच्यांवर तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.