Nagpur News : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड

नागपूर : शहरातील एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नी एका परपुरुषासोबत रात्र घालवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्धा मार्गावरील एका मोठ्या हॉटेलमध्ये पतीने पत्नीला जिगोलोसोबत रंगेहाथ पकडले.

प्रेमसंबंधाचा संशय पतीच्या लक्षात आला अन्…

पत्नी पार्टीच्या बहाण्याने रात्री घराबाहेर राहू लागल्याने पतीला संशय आला. त्याने गाडीत जीपीएस ट्रॅकर बसवून पत्नीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. मात्र पत्नीला याचा संशय येताच ती सावध झाली व पतीला झोपेच्या गोळ्या देऊन तो गाढ झोपल्यानंतर बाहेर जाऊ लागली.

मुलीच्या प्रकृतीने उघड झाला प्रकार


काही दिवसांपूर्वी पत्नी अशाच प्रकारे हॉटेलमध्ये गेली असताना रात्री मुलीच्या पोटदुखीचा त्रास सुरू झाला. गाढ झोपेत असलेल्या वडिलाला उठवणे अशक्य झाले. त्यामुळे मुलीने काकांना फोन करून घरी बोलावले. काकांनी त्यांना उठवल्यानंतर झोपेच्या गोळ्या देण्यात आल्याचा संशय बळावला.

हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले

जीपीएस ट्रॅकरच्या मदतीने पतीने पत्नीचे लोकेशन ट्रॅक केले आणि नातेवाइकांसोबत हॉटेलमध्ये पोहोचला. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीयतेच्या कारणाने प्रवेश नाकारला. मात्र, दम्याचा त्रास असल्याचे कारण देत दरवाजा उघडण्यास भाग पाडले. खोलीत पत्नी एका जिगोलोसोबत नको त्या अवस्थेत सापडली.

कौटुंबिक वाद आणि तक्रार मागे

हॉटेलमध्ये गोंधळ उडाल्यानंतर पतीने तक्रार दाखल केली. मात्र, मुलीच्या भवितव्यासाठी तक्रार मागे घेतली. या घटनेनंतर पतीने पत्नीला घरात ठेवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पत्नी आपल्या माहेरी निघून गेली असून, या घटनेने नागपूरच्या व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.