---Advertisement---

पत्नी माहेरी, इकडे पतीने उचललं टोकाचं पाऊल

---Advertisement---

भुसावळ : तालुक्यातील कुन्हे पानाचे गावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच संदीप वसंत पाटील (४०) या ट्रक चालकाचा मृतदेह घरात आढळला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली.

संदीपची पत्नी माहेरी निघून गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील याचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. शुक्रवारी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने एकनाथ पाटील व त्यांचा मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले.

---Advertisement---

संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मृतदेह भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला ठार

धुळे : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत वृद्ध पादचारी महिला ठार झाल्याची घटना शिरपुरातील करवंद रोडवरील भूमी गार्डन येथे दि. १७ रोजी घडली. नादरबाई विक्रम पवार (वय ६२, रा. अमरोली, सुरत) असे मृत वद्धेचे नाव आहे. तर दुचाकीच्या मागे बसलेले दीपक तोगर भील हे गंभीर जखमी झाले आहे.

याप्रकरणी राज दिनेश ढिवरे (२१, रा. अमरोली, सुरत) याने दिलेल्या फिर्यादीवरून दि. १७ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास करवंद रोडवर दुचाकीस्वार राजेद्र मंगा भील (रा. भामपूर, ता. शिरपूर) हा एमएच १२ जीई १७१ दुचाकी वेगाने घेऊन जात असताना नादरबाई पवार (६२) यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात नादरबाई यांचा जागीच ठार झाली. तसेच दुचाकीच्या मागे बसलेले दीपक भील हेदेखील गंभीररीत्या जखमी झाले. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार राजेंद्र भील याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास उपनिरीक्षक हेमंत खैरनार करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---