धक्कादायक! आधी पत्नीवर केला जीवघेणा हल्ला ; मग रेल्वेखाली झोकून देत केली आत्महत्या, जळगाव तालुक्यातील घटना

---Advertisement---

 

जळगाव : कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने पत्नीवर लोखंडी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आनंदा महारू धनगर (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बोरनारच्या प्लॉट एरिया येथे आनंदा महारू धनगर (वय 42) हा पत्नी रेखा व दोन मुलांसह वास्तव्यास होता. दरम्यान, आज मंगळवारी दोघांत कौटुंबिक वाद झाला. या वादातून संतापलेला पती आनंद याने पत्नी रेखा हिच्यावर लोखंडी कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला.

पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीची आत्महत्या

यानंतर त्याने म्हसावद रेल्वे गेटजवळ धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पत्नीची प्रकृती चिंताजनक

या हल्लयात पत्नी रेखा गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---