बिहार : पत्नी प्रियकरासोबत आनंदात राहावी म्हणून पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून, ती वाचून पोलिसही भावुक झालेय. कुमुद यादव (२२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
बिहारच्या सुपौलतील नगर परिषद क्षेत्र लतौना मिशन वार्ड-१८ मधील हे प्रकरण आहे. बुधवार, ४ रोजी पोलिसांना कुमुद या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. या वेळी पोलिसांना त्याच्या खिशातून आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

तरुणाने चिठ्ठीत काय लिहलं?
तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहलं की, ‘चंदा मी तुमच्यावर खूप प्रेम केलं होतं. आजही करतो. पुढेही करत राहीन. पण तुम्ही कुठल्यातरी युवकाच्या प्रभावाखाली आहात. म्हणून मी तुम्हाला आता आवडत नाही.
मला माहित आहे, तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला स्वतंत्र करतोय. तुम्ही त्याच्यासोबत आनंदी राहा. माझी त्या युवकाबद्दल काहीही तक्रार नाही.
फक्त मी माझं जीवन संपवतोय, आय लव यु चंदा’, चिठ्ठीत असा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले तसेच चिठ्ठी वाचून पोलिसही भावून झाल्याचे त्यांनी सांगितले.