पुणे : लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून पत्नीकडून होणाऱ्या छळाला त्रासून पतीने कौटुंबिक न्यायालयात दाद मागितली. परस्पर संमतीने विभक्त होण्याच्या निर्णयानंतर न्यायालयाने ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळत हे प्रकरण मिटवलं आहे. लग्नानंतर फक्त एका वर्षात हे जोडपे कायमचे विभक्त झाले. दरम्यान, या प्रकरणामुळे जबरदस्तीच्या लग्नांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरही चर्चा सुरू झाली आहे.
नरेंद्र (नाव बदलले) आणि कविता (नाव बदलले) यांचा विवाह ६ डिसेंबर २०२३ रोजी झाला. मात्र, कविताला हे लग्न करायचे नव्हते. कुटुंबीयांच्या दबावाखाली तिने लग्न केले होते.
हेही वाचा : पतीला झोपेच्या गोळ्या देऊन ‘ती’ जायची परपुरुषासोबत; मुलीला जाग आली अन् महिलेचं कांड उघड
विवाहानंतर काही दिवसांतच तिने पतीला व सासरच्या मंडळींना त्रास देण्याचा इशारा दिला. पतिच्या केस ओढणे, नखांनी ओरबाडणे अशी वागणूक दिल्यामुळे नरेंद्रने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण कविताने १४ दिवसांत माहेर गाठले.
नरेंद्रने तिला नांदायला आणण्यासाठी प्रयत्न केले, पण ती परत येण्यास तयार नव्हती. पत्नीच्या या वागणुकीमुळे वैतागलेल्या नरेंद्रने ॲड. निखिल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात क्रूरतेच्या आधारे घटस्फोटासाठी दावा दाखल केला.
हेही वाचा : Sharon Raj murder case : विश्वास ठेवावा तर कुणावर ? प्रेयसीनेच केला घात, अखेर फाशीची शिक्षा
सुनावणीदरम्यान, पती-पत्नीने परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यायालयाने ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळण्याची विनंती मान्य केली. न्यायाधीश के. व्ही. ठाकूर यांनी या दाव्याला शिक्कामोर्तब करत घटस्फोट मंजूर केला.
या प्रकरणामुळे जबरदस्तीच्या लग्नांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवरही चर्चा सुरू झाली आहे. तसेच, ‘कूलिंग ऑफ पीरियड’ वगळण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.