कौटुंबिक वाद विकोपाला, पतीने पत्नीच्या डोक्यात टाकला हातोडा

---Advertisement---

 

जळगाव : भुसावळ तालुक्यातील किन्ही एमआयडीसी येथे सेंट पॉल स्कूलच्या बांधकामस्थळावर राहणाऱ्या एका दाम्पत्यामध्ये कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडा टाकून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घटना घडली. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी ५ वाजता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना एकाला बेदम मारहाण

जळगाव : भजे गल्ली भागात कटलरीच्या लोटगाडीजवळ मधुकर वाणी (वय ५२) या व्यक्तीला एकाने कोणतेही कारण नसताना, बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी हर्षल विजय चौरसिया याच्यावर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडीचा गुन्हा उघड, २ लाखांचे फोन हस्तगत

जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी बॅटरी चोरीच्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावल्याच्या पाठोपाठ, पोलिसांनी २४ तासांच्या आत एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत सुमारे २ लाख रुपये किमतीचे तीन महागडे मोबाइल फोन हस्तगत केले आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---