---Advertisement---

Crime News : पत्नी सतत भांडायची; रागाच्या भरात गोपाळने…, सोलापुरात भयंकर घडलं

---Advertisement---

Solapur Crime News : दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह केलेल्या पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरच्या उळे गावात ही घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोपाळ लक्ष्मण गुंड (३०) आणि गायत्री गोपाळ गुंड (२२) दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या उळे गावात गोपाळ लक्ष्मण गुंड (30) आणि गायत्री गोपाळ गुंड (22) हे वास्तव्याला होते. विशेषतः त्यांचा दोन महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. दरम्यान, काल रविवारी आषाढी एकादशीनिमित्ताने त्यांचे कुटुंबीय कीर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यावर ही घटना उघडकीस आली.

---Advertisement---

चार्जरच्या वायरने केला खून

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत, दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, लग्नानंतर दोघांमध्ये शुल्लक कारणांवरून वारंवार वाद होत होते.

याच वादातून पती गोपाळ याने पत्नी गायत्री हिचा चार्जरच्या वायरने गळा आवळत खून केला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---