Actress Charu Asopa : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत अनेक अभिनेत्रींच्या खासगी आयुष्यात मोठे वाद आणि संकटे येत असतात. अभिनेत्री चारू असोपा आणि तिचा माजी पती राजीव सेन यांच्यातील संबंध आणि त्यामधील वाददेखील चव्हाट्यावर आले होते. दोघे विभक्त झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. त्यातील सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे ‘चारूचं ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध असल्याचा…’ जो राजीव सेनने केला होता.
राजीवने चारूवर संशय घेतल्याचे अनेकदा समोर आले आहे. एका मुलाखतीत चारूने सांगितले की, “राजीव काहीही कारण नसताना माझ्यावर संशय घेत राहायचा. घरात कोणी पाहुणे आले आणि मी त्यांची विचारपूस केली, तरी तो संशय घ्यायचा. एखाद्या गोष्टीला उत्तर दिलं तरीही तो मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचा.”
चारूने पुढे सांगितले, “राजीवने माझ्यावर अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की, ‘तुझे तुझ्या ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध आहेत.’ हा आरोप पूर्णपणे खोटा होता. त्यामध्ये काहीही तथ्य नव्हतं. मी मॅरिज काउंसलिंगसाठी तयार होते, पण राजीव यायला तयार नव्हता.”
चारू असोपानेही राजीववर गंभीर आरोप केले होते. “माझ्या मनात कायम शंका यायची की, राजीव माझी फसवणूक करत आहे. त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी आहे. तो कायम दिल्लीत जायचा. मी शूटिंग सेटवर असताना तो सतत मला मेसेज करायचा, फोन करायचा. एवढंच नाही, तर इतर लोकांना फोन करून सांगायचा की ‘चारूपासून सावध राहा.’”
दरम्यान, चारू आणि राजीव हे आता विभक्त झाल्याने वाद काही प्रमाणात थंडावला आहे. चारू तिच्या मुलीसोबत राहते, तर राजीव वेळोवेळी दोघींना भेटण्यासाठी येत असतो.
दरम्यान, सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. या वादानंतरही चारूने तिच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारली असून, ती आपल्या मुलीसोबत नवे जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे.