Barsa News : गर्भवती पत्नीने पाणी मागितल्याच्या रागातून पतीने तिला थेट ६० फूट खोल विहिरीत ढकलल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या महिलेचे प्राण वाचले असून, यातून ‘देव तारी त्याला त्याला कोण मारी’ ही म्हण खरी ठरली आहे.
पोलीस सूत्रानुसार, नराधम पतीने या महिलेलाच नव्हे तर त्याच्या मुलांनाही विहिरीत ढकलले. त्यानंतर तो पळून गेला. सुदैवाने महिला विहिरीत पडताना योगायोगाने तिचा एक हात विहिरीच्या खड्ड्यात अडकला. यामुळे ती तब्बल २८ तास लटकून होती. महिला स्वतःला वाचवण्यासाठी ओरडत राहिली, परंतु तिचा आक्रोश कोणालाही लक्षात आला नाही.
दुसऱ्या दिवशी या परिसरातून काही लोक जात असताना, त्यांना महिलेचा आवाज ऐकू आल्याने ते मदतीला धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, विहिरीत अडकलेल्या महिलेला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. यावेळी महिला खूप घाबरली होती आणि ती नीट बोलूही शकत नव्हती. पोलिसांनी सांगितले की, पीडितेचे नाव कांचन आहे, ती २१ वर्षांची आहे. ती बरसा गावची रहिवासी आहे.
फरार पतीचा शोध घेत आहेत पोलिस
सुरुवातीच्या चौकशीत पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिच्या पतीला दोन बायका आहेत. महिलेने सांगितले की, तिच्या पतीने तिला का ढकलले याबाबत काहीही माहिती नाही. परंतु, त्याने तिला सांगितले की, तो या विहिरीत राहील आणि दुसरी पत्नी दुसऱ्या विहिरीत राहील. तसेच त्याने, तो दोघीनांही भेटत राहील. सध्या पोलिस फरार आरोपी पतीचा शोध घेत आहेत.