Crime News : सध्या देशात मेरठ हत्याकांड चांगलचं गाजत आहे. या प्रकरणातील निळ ड्रम आणि सिमेंट चर्चेत असताना आता पुन्हा एकदा ड्रम हा विषय चर्चेत आला आहे. मेरठसारखाच विषय समोर आला असून, या प्रकरणात लव्ह मॅरेज केलेल्या एका पत्नीने आपल्या पतीला तुकडे करून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली आहे. एवढ्यावरचं ही महिला थांबली नसून, तिने आपल्या अभियंता पतीला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रकरण.
खळबळजनक असा हा प्रकार गोंडा जिल्ह्यातील जल निगम विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता धर्मेंद्र कुशवाह यांच्यासोबत घडला आहे. धर्मेंद्र यांची पत्नी माया मौर्याने तुकडे करून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित अभियंत्याने केला आहे. पत्नीने पतीवर केलेल्या मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. १९ मार्च रोजी झालेला हा प्रकार लक्षात घेता पत्नीकडून धमकी व मारहाण होत असल्याने घाबरलेल्या धर्मेंद्र यांनी पोलिसांकडे सुरक्षाची मागणी केली आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांना पत्नी मायाने यापूर्वीही मारहाण केली आहे. त्याबाबत धर्मेंद्र यांनी पत्नीविरोधात दोन वेळा मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून, त्याचा तपास पोलिस करत आहेत. त्यात आता पुन्हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा : १ एप्रिलपासून देशात लागू होणार नवे नियम, घरातील प्रत्येकाच्या खिशावर होणार परिणाम!
कंत्राटदाराशी अवैध संबंधाचा आरोप
दरम्यान, या प्रकरणात पीडित पती धर्मेंद्र याने पत्नी माया हीचे कंत्राटदार नीरज मौर्यसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे. ७ जुलै २०२४ रोजी धर्मेंद्र पत्नी मायासोबत झोपले होते आणि नीरज मौर्य शेजारच्या खोलीत झोपला होता. रात्री धर्मेंद्र यांना जाग आली असता पत्नी नातेवाईक नीरज मौर्यसह बाजूच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत आढळून असल्याचा आरोपही धर्मेंद्र यांनी केला आहे. त्यानुसार पत्नीच्या प्रियकरावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धर्मेंद्र यांनी केली आहे.
दोघांचेही लव्ह मॅरेज
धर्मेंद्र कुशवाह आणि माया मोर्या यांचा 2016 मध्ये प्रेमविवाह झाला असून, दोघांना एक अपत्यही आहे. मात्र त्यांच्या या सुखीसंसाराला नजर लागत लग्नानंतर काही दिवसांनी दोघांत खटके उडण्यास सुरुवात झाली. धर्मेंद्र कुशवाह यांनी नगर कोतवाली भागात खरेदी केलेल्या जमिनीवर घर बांधण्यासाठी पत्नी माया मौर्य यांचे दूरचे नातेवाईक नीरज मौर्य यांना बांधकामाचे काम दिले. येथेच दोघांचे सुत जुडल्याचे धर्मेंद्र यांचे म्हणणे आहे.