दुर्दैवी ! पावसामुळे विहीर ढासळली; मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने पती, पत्नीचा मृत्यू

धुळे : सततच्या पावसामुळे विहीर ढासळल्याने पती, पत्नीचा मृत्यू झाल्याची सांगवी येथे घटना घडली. रेबा पावरा आणि  मीनाबाई पावरा असे मयत पती पत्नीचे नाव आहे.

शिरपूर तालुक्यातील सांगवी येथे  पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. मयत रेबा पावरा आणि त्यांची पत्नी मीनाबाई पावरा दोघेही शेतात ज्वारीच्या पेरणीचे काम करत होते. दुपारीच्या सुमारास मीनाबाई काही कामानिमित्त घरी आल्या. अचानक शेतात मोठा आवाज आल्याने रेवा आणि मीनाबाई धावत शेताकडे गेले. दोघेही उभी असलेली जमीन खचली आणि विहीलगत असलेली मातीचा ढिगारा त्यांचा अंगावर पडला.

आजूबाजूला असलेल्या नागरिकांना जमीन खचत असल्याने बचावकार्य जमले नाही. प्रथम विहीर ढासळते असे आढळून आले हे पाहून रेबा आणि मीनाबाई विहिरीनजीक पोहचले.अचानक पती पत्नी उभे असलेली जमीन सुद्धा खचली आणि दोघेही विहिरीत पडले. यांच्यासह शेजारच्या संतुबाई सुद्धा त्यांचा नातवासहित विहिरीत कोसळल्या नागरिकांनी त्यांचा कसेबसे बाहेर काढले पण रेबा आणि मीनाबाई यांचा बचावकार्य करत असताना आणखी जमीन खचू लागली, मातीचा ढिगारा पडू लगाला त्यामुळे ग्रामस्थांना बचावकार्य करता आले नाही.

ग्रामस्थांनी अखेर स्थानिक प्रशासनाला याबद्दल माहिती दिली तब्बल दीड तासानंतर जेसीबी आला आणि मदतकार्य सुरु झाले. घटनेची माहिती मिळतास गटविकास अधिकारी संजय सोनावणे, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, मंडळ अधिकारी प्रवीण मराठे, तलाठी प्रकाश पावरा, सरपंच शीला पावरा यासह तालुका पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

२५ ते ३० फूट खोल विहीर
बिरसा मुंडा योजनेत अंतर्गंत विहिरीचे बांधकाम मागील वर्षी डिसेंबर महिन्यात करण्यात आले होते. सुमारे २५ ते ३० फूट खोल विहीर खोदण्यात आली. सध्या विहिरीत पाण्याचा एकही थेंब नाही, ही विहीर मुरमाळ जमिनीवर बांधण्यात आली होती. रेबा आणि मीनाबाई यांच्या झोपडीपासून १५-२० मीटर अंतरावर ही विहीर होती. तब्बल चार तासानंतर म्हणजेच दुपारी पाच वाजेच्या सुमारास विहिरीतून दोघांना बाहेर काढण्यात यश आले पण ढिगाऱ्याखाली गुदमरुन पती पत्नीचा मृत्यू झाला.