---Advertisement---

जेवण न दिल्याच्या राग : संतापलेल्या पतीने पत्नीला…, बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

---Advertisement---

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. ही घटना पुण्याच्या अप्पर इंदिरानगर परिसर रविवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

सविता संदीप औचिते असं मृत महिलेचं नाव आहे. तर आरोपी पती परशुराम जोगण याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश दत्तात्रय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आरोपी पती परशुराम हा रिक्षा चालक आहे. भाड्याची रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. तर मयत महिला ही त्याची दुसरी पत्नी होती. रविवारी रात्री त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. मयत पत्नीने दारू प्यायली होती होती, तसेच तिने त्याला जेवणही दिले नाही. याचाच राग मनात धरून आरोपीने पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिची हत्या केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment