तुमच्याकडे कार असेल तर हे वाचाच, कारण या कंपनीने परत मागिविल्या 7698 गाड्या

नवी दिल्ली : कार वापरणे हे आता खूप विशेष राहिलेले नाही. सर्वसामान्यांपासून मध्यमवर्गियांपर्यंत प्रत्येकजण कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करु शकतो. मात्र तुम्ही घेतलेली कार सुरक्षित आहे की नाही ? याची तपासणी करणे खूपच आवश्यक असते. आताही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या कंपनीने मोठा निर्णय घेत विकलेल्या तब्बल ७ हजार ६९८ गाड्या ग्राहकांकडून परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पादनात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आढळल्यास परत बोलावण्याचा निर्णय घेतला जातो. परत मागवलेल्या वाहनांच्या दुरुस्तीसाठी कंपनी ग्राहकांकडून शुल्क घेत नाही. हुंडाईने तांत्रिक बिघाडामुळे देशातील 7698 वाहने परत मागवली आहेत. Hyundai ची Creta SUV व व्हर्ना या दोन्ही कारच्या 1.5-लिटर नॅटरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असलेले फक्त CVT ऑटोमॅटिक व्हेरिएंट परत मागवले आहेत. या रिकॉलबाबत कंपनीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला कळवले आहे.

या रिकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या दोन्ही कारचे उत्पादन 13 फेब्रुवारी 2023 ते 06 जून 2023 दरम्यान करण्यात आले होते. वाहन रिकॉलवरील ही कारवाई करण्यात येत आहे. त्यांनी सांगितले की क्रेटा आणि व्हर्नाचे इलेक्ट्रॉनिक इंधन पंप कंट्रोलर खराब असू शकते. यामुळे CVT गिअरबॉक्समधील इलेक्ट्रॉनिक इंधन पंपाची कार्यक्षमता बिघडू शकते.