Hyundai Venue भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स

तरुण भारत लाईव्ह ।०२ फेब्रुवारी २०२३। Hyundai मोटर्स इंडियाने Hyundai Venue लाँच केली आहे. यामध्ये तुम्हाला भन्नाट फीचर्स पहायला मिळतील. Hyundai Venue यामध्ये कोणते फीचर्स आहेत आणि या कारची किंमत काय आहे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातुन.

Hyundai Venue ला कंपनीची टॉप सेलिंग एसयूव्ही क्रेटाचे डिझेल इंजिन दिले आहे. हे इंजिन 116PS पॉवर आणि 250Nm पिक टॉर्क जनरेट करते. २०२३ ह्युंदाई वेन्यू मध्ये १.२ लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन सोबत १.० लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळते. जे 83PS पॉवर आणि 114Nm पिक टॉर्क सोबत 120PS पॉवर आणि 172Nm टॉर्क जनरेट करते. अपडेटेड ह्युंदाई वेन्यू मध्ये साइड एअरबॅग सुद्धा ऑफर केली आहे. यासोबत रियर सीट रिक्लाइनर, आर्मरेस्ट, कप होल्डर सारखे खास फीचर्स दिले आहेत.

वेन्यूच्या डिझेल व्हेरियंट्सची किंमत ११.६२ लाख रुपये ते १२.६६ लाख रुपये पर्यंत आहे. या सर्व एक्स शोरूम किंमती आहेत. जुन्या मॉडलच्या तुलनेत २०२३ च्या वेन्यूच्या किंमतीत २५ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.