मी भ्रष्टाचारी.. मला सीबीआयने बोलावलं आहे, मी अवश्य जाणार – अरविंद केजरीवाल

तरुण भारत लाईव्ह न्युज : . मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल त्यांचे नाव समोर आले आहे.यांना सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले असून उद्या त्यांची सीबीआय चौकशी होणार आहे.. त्यावर अरविंद केजरीवाल म्हणाले की, सीबीआयने मला उद्या बोलावले आहे, मी अवश्य जाणार.”जर अरविंद केजरीवाल भ्रष्टाचारी असेल, तर या जगात असा कोणीच नसेल जो प्रामाणिक असेल.” पुढे बोलताना केजरीवाल म्हणाले, भाजपने सीबीआयला अटक करण्याचा आदेश दिला असेल तर सीबीआय त्याचे पालन नक्की करेल.

आपचे नेते मनीष सिसोदिया यांना यापूर्वीच अटक करण्यात आली असून आता मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवालांचे नाव समोर आले आहे. सीबीआयने शुक्रवारी समन्स बजावून रविवारी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अरविंद केजरीवाल हे सीबीआय मुख्यालयात हजर राहून तपासात सहकार्य करणार असल्याचे आपचे खा. संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.