तरुण भारत लाईव्ह ।०१ फेब्रुवारी २०२३। धकाधकीच्या जीवनात माणूस खाण्या पिण्याकडे सहसा दुर्लक्ष करतो. पिझ्झा, वडापाव यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड असली की संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाणही वाढतं. रोगप्रतिकारक शक्ती कमी असली कि माणूस सतत आजारी पडत असतो. मग ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहेत कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
कोणताही शारीरिक आजार रोखण्यासाठी मुख्य आणि महत्त्वाची बाब म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणे. जर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती जास्त असेल तर तुम्ही या सर्व शारीरिक आजारांना जसे ताप, खोकला, या आजारांना सहज बळी पडणार नाही. जंतूसंसर्ग, तसेच अॅलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ही लोक सतत आजारी पडतात. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे त्या लोकांनी आपल्या आहारात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश करावा.
बाहेरील पदार्थ जास्त खाऊ नये. रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असल्यास रोज एक तास व्यायाम करणं गरजेचं असत. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी पुरेशी झोप घेणं सुद्धा आवश्यक असत. जेवणाची वेळ निश्चित असावी. निरोगी राहण्यासाठी फळे अधिक प्रमाणात खा. कोणतेही नैसर्गिक पोषणयुक्त फळ शरीरावर चांगले कार्य करते. याशिवाय रोगप्रतिकारककशक्ती वाढवण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सीसाठी तुम्ही मोसंबी, लिंबू, यांसारखी फळे खाऊ शकता.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. पालक हे जीवनसत्त्वे अ आणि क चा चांगला स्रोत आहे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे भरपूर प्रमाणात असते. हे घटक अनेक आरोग्य फायद्यासाठी चांगले आहेत.