मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, अजित पवार असं का म्हणाले?

Maharashtra Politics : जसं राज ठाकरे यांनी काकाकडे लक्ष ठेवलं, तसंच मीही काकाकडे लक्ष ठेवतो असं सुचकं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. मुंबईमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, “तव्यावरची भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, आता वेळ वाया घालवण्यात अर्थ नाही.” त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पक्षात नवीन चेहेर असले पाहिजेत, तरुणांना संधी मिळाली पाहिजे या उद्देशाने पवार साहेब असे बोलले असतील, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काकांकडे लक्ष देण्याच्या दिलेल्या सल्ल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज ठाकरेंना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. ‘लोकमत’च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजितदादांना सल्ला दिला होता.

शिवाय, पवार यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवारांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यावरून १० वर्षांपासून प्रलंबित मुद्दा उचलला आहे. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केले आहे.

‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा लढा दशकाहून अधिक काळ सुरु आहे. अभिजात भाषेसाठीचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करत असल्याचे पुरावे तसंच त्यासंदर्भातील तपशीलवार अंतरिम अहवाल महाराष्ट्राच्यावतीने २०१३ मध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे व २०१४ मध्ये अंतिम निर्णयासाठी केंद्रसरकारकडे पाठवण्यात आला. तेव्हापासून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे अजित पवारांनी म्हटले.